मराठी सिनेसृष्टीत आपल्या अदांनी सगळ्यांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने आजवर आपल्या अभिनयाने व अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. अमृताने आपल्या प्रत्येक चित्रपटातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. ती फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. अमृताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. अमृतासाठी आज खूप खास दिवस आहे. तिचा आज ३९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यासाठी अभिनयसृष्टील बऱ्याच कलाकारांनी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरून देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता हिमांशूनेही तिच्याबरोबचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (amruta khanvilkar birthday special post her husband)
हिमांशुने अमृताबरोबचा एक खास फोटो शेअर करत त्याला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. त्यात तो लिहितो, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमु. तु माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहेस आणि नेहमी राहशील. मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या पाठीशी उभा असेन”, असं कॅप्शन देत त्याने अमृताला गोड शुभेच्छाही दिल्या.
या पोस्टवर अमृतानेही कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. तिने देखील हिमांशूची शेवटपर्यंत साथ देणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने मागील २० वर्षे तिचा वाढदिवस खास प्रकारे साजरा केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांसह इतर नेटकऱ्यांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अमृताने हिंदीतील छोट्यापडद्यावरील अभिनेता हिमांशू मल्होत्रा याच्याबरोबर २०१५मध्ये लग्नगाठ बांधली. अमृता व हिमांशू यांची भेट २००४मध्ये झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्नाचा विचार केला. पण लग्नानंतर काही काळानंतर ते एकमेकांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अमृता अधिक तर मराठी सिनेसृष्टीत काम करते त्यामुळे ती मुंबईत असते. तर हिमांशूची बरीच कामे दिल्लीत असतात त्यामुळे त्याचं वास्तव्य दिल्लीत आपल्या आईबरोबर राहतो. मात्र दोघेही त्यांच्या कामातून वेळ काढत काही क्षण एकमेकांबरोबर घालवताना दिसतात. त्यावेळी ते त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.