‘बिग बॉस’चं १७वं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. घरात स्पर्धकांमध्ये होणारी भांडणं तर आता विकोपाला गेली आहेत. अशातच अंकिता लोखंडेचं गरोदरपण नवा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे आणि हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये येत्या ‘विकेण्ड वार’मध्ये सलमान खान स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेणार असल्याचं दिसत आहे. या भागात सलमान ‘बिग बॉस’ची सर्वात लोकप्रिय स्पर्धक अंकिताबरोबर एका खासगी सत्रात बोलणार आहे. ज्यात फक्त सलमान व अंकिता यांच्यातच चर्चा होणार आहे. (Salman Khan Angry On Ankita Lohande)
गेल्या आठवड्यात अंकिता पती विकी जैनवर खूप नाराज होती. ‘बिग बॉस’च्या घरात विकी त्याच्या सहकारी स्पर्धकांशी मैत्री करत आहे. यावरही तिचा आक्षेप आहे. अंकिता-विकी यांच्या दररोजच्या भांडणाला ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकच नव्हे, तर प्रेक्षकही वैतागले आहेत. त्यामुळे येत्या ‘विकेण्ड वार’मध्ये सलमान अंकिताला तिच्या खेळाबद्दल सल्ला देणार आहे. यासाठी ‘दिल का मकान’मध्ये असलेल्या ‘थेरपी’ रूममध्ये सलमान अंकिताशी बोलणार आहे.
Promo BiggBoss17 WKW, Salman Khan angry on Aurag Dobhal, Ankita Lokhande ko bulaya meditation room pic.twitter.com/SGRnBO61q0
— The Khabri (@TheKhabriTweets) November 16, 2023
या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धक सलमानला चुकीचे समजत आहेत. त्या स्पर्धकांना उद्देशून सलमान असे म्हणतो की, “मला चुकीचे समजणाऱ्यांनी मला खुशाल चुकीचे समजा आणि तुम्हाला जे वाटतंय ते करा”. यापुढे तो अंकितालाही काही प्रश्न विचारत असे म्हणतो की, “अंकिता तू या शोमध्ये आल्यापासून तुझं फक्त विकी, विकी, विकी चालू आहे. ज्यामुळे तुझं तुझ्या खेळाकडे लक्ष नाही. विकी स्वत:चा खेळ खेळत आहे, मात्र तू तुझा खेळ खेळत नाही?”.
दरम्यान सलमानने अंकिताबरोबर केलेल्या या संभाषणामुळे येत्या भागात अंकिताच्या खेळात काहीतरी सुधारणा होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. त्यामुळे ‘विकेण्ड वार’साठी त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या आगामी भागांसाठी चाहतेदेखील कमालीचे उत्सुक आहेत हे नक्की.