छोट्या पडद्यावरील बराच गाजलेला गाण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडल’. २००४ साली या कार्यक्रमाचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्याने भारतभर संगीताचा नवा अध्याय सुरु केला. या शोचं अजिंक्यपद अभिजीत सावंतने आपल्या नावावर केलं होतं. या शोमध्ये गायक अमित साना व अभिजीत सावंत हे दोघांमध्ये सुरांची चांगलीच लढत झाली होती. या दोघांचे त्यावेळीही बरेच चाहते होते पण शेवटी अभिजीत या कार्यक्रमाचा विजेता ठरला. आता या गोष्टीला १९ वर्षे उलटून गेली आहेत. पण इतक्या वर्षांनंतर आता अंतिम फेरीत अभिजीत बरोबर लढत असलेल्या अमितने एक खळबळजनक खुलासा केला आहे. ‘इंडियन आयडल’ शोने अशी परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे तो हा कार्यक्रम जिंकू शकला नाही. (Amit sana revealed about make abhijeet sawant winner)
अमितने स्पष्ट करताना सांगितलं ‘इंडियन आयडल’ शोने अभिजीतला जिंकवण्यासाठी त्याची वोटिंग लाईन ब्लॉक केली होती. २००४ या वर्षाला मागे वळून पाहता हे स्पष्ट दिसतं की, ‘इंडियन आयडल’चा पहिला सीजन बराच गाजला. या शोनंतर अभिजीत सावंत व अमित सना यांच्यातील अंतिम लढत पाहता प्रेक्षकांना गाण्याबाबत उत्साह आणखीनच वाढला. पण या कार्यक्रमाबाबत अमितने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. तो याबद्दल बोलताना म्हणला, “अभिजीतला या कार्यक्रमाचा विजेता करण्यासाठी प्लॅन करण्यात आली होती. त्याला जिंकवण्यासाठी अंतिम फेरीत माझी वोटिंग लाइन दोन दिवसांपूर्वीपासूनच ब्लॉक केली गेली होती”.
याबाबत तो पुढे सांगतो, “एवढ्या वर्षानंतर मी हा विषय उघडून काढू इच्छित नव्हतो”. त्याने यासाठी अभिजीतची माफीही मागितली. त्याने यासह विनोदी अंदाजात सांगितलं की, “या सगळ्यात अभिजीतला केवळ प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्याकडे लोक गांभिर्याने पाहायला लागले”. त्यानंतर त्याने या शोमधील दुसरा स्पर्धक राहुल वैद्यबद्दलही भाष्य केलं.
याबाबत बोलताना तो राहुल वैद्यबाबत बोलताना म्हणाला, “राहुल व अभिजीत बरेच भांडायचे. बऱ्याचदा राहुल मलाही भडकवायचा. त्याला सत्तेत राहणं आवडायचं. तो नेहमी अशा लोकांबरोबर राहायचा जे नेहमी प्रभावशाली असतील ज्यांच्याकडे सत्ता असेल. राजकारणातही त्याचे बरेच चांगले संबंध होते”. ‘इंडियन आयडल’नंतर अमितने आणखी एक रिऑलिटी शो ‘जो जिता वही सुपरस्टार’मध्ये देखील भाग घेतला होता. पण त्या शोमध्ये तो पहिल्या आठवड्यातच बाहेर पडला होता. ‘इंडियन आयडल’मधील त्याने गायलेलं ‘चल दिए’ हे गाणं बरंच हिट ठरलं होतं. त्यानंतर त्याला बॉलिवूडमधील ‘कलयुग’, ‘दिल्ली हाइट्स’ चित्रपटांना त्याला पार्श्वगीत गायनाची संधी मिळाली होती.