सध्या सिनेमाविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. एकामागोमाग एक कलाकार मंडळी थाटामाटात लग्नसोहळा उरकत असल्याचं दिसत आहे. सध्या अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांच्या लग्नाची धामधूम सुरु असून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे अनेक फोटोस व्हायरल होतं आहेत. याआधी या जोडीच्या केळवणाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर आता मराठमोळ्या कलाकारांची आणखी एक जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni New Video)
स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वानंदी व आशिष यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली देत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काचं दिला. त्यानंतर दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून बरेच व्हायरल झाले होते.
स्वानंदीने इंस्टाग्राम अकाउंटवरून लवकरच आम्ही लग्न करणार आहोत अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. स्वानंदी व आशिष यांची ही लगीघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. स्वानंदीने ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासह काम केले होते. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत स्वानंदी व आशिषचं केळवण केलं आहे. या फोटोंसह कॅप्शन देत स्वानंदी म्हणाली आहे की, “हे पहिलं केळवण होतं, आता लाईन लागलीचं.” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या पहिल्या केळवणाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.
यानंतर आता स्वानंदीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वानंदी व आशिषचा आणखी एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यांत टिकेकर कुटुंबीय स्वानंदी व आशिषसह बाहेर जेवायला गेलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये स्वानंदी आशिष यांच्यासह टिकेकर कुटुंब एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहेत. व्हिडिओमध्ये स्वानंदी व आशिष तसेच उदय टिकेकर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.