शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भावाच्या हळदीसाठी नटली नम्रता संभेराव, लेक-पतीसह फोटो शेअर करत म्हणाली, “मामाची हळद…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 17, 2023 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao On Pramruta Wedding

भावाच्या हळदीसाठी नटली नम्रता संभेराव, लेक-पतीसह फोटो शेअर करत म्हणाली, “मामाची हळद…”

अमृता देशमुख व प्रसाद जवादेची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. ग्रहमख, मेहंदीचे अनेक फोटोस, व्हिडीओस सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. प्रसाद अमृताच्या मेहंदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. यानंतर आज प्रसाद अमृताची हळद जोरात सुरु असल्याची पाहायला मिळतेय. अमृताच्या हळदीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावर तिच्या लूकचं जोरदार कौतुक होतं आहे. (Namrata Sambherao On Pramruta Wedding)

प्रसाद-अमृताच्या हळदीसाठी सिनेविश्वातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसादच्या लग्नासाठी अभिनेत्री नम्रता संभेरावने हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच नम्रताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून प्रसाद -अमृताचा हळदी लूक शेअर केला होता. यांमध्ये अमृता, प्रसादच्या हळदी लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. फुलांच्या नक्षीने बहरलेला अमृताचा पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि अमृताच्या ड्रेसला साजेसा प्रसादचा कुर्ता या फोटोमध्ये पाहायला मिळाला.

आणखी वाचा – Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”

त्यानंतर आता नम्रताने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टने आणि पोस्टच्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नम्रता प्रसाद- अमृताच्या हळदीसाठी तिच्या कुटुंबियांसह गेली आहे. एकत्र कुटुंबाचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे, यांत नम्रता तिचा पती व त्यांचा मुलगा रुद्राज पाहायला मिळतोय. यावेळी तिघांचाही पिवळ्या रंगाचा ड्रेसकोड पाहायला मिळतोय. याखाली नम्रताने दिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मामाची हळद असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. यावरून प्रसाद हा नम्रताचा भाऊ असल्याचं समोर आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

आणखी वाचा – “त्यांनी मला मारलं आणि…”, नाना पाटेकरांचा मार खालेल्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, आरोप करत म्हणाला, “त्यांच्याजवळ जाताच…”

ग्रहमख विधी पार पडल्यानंतर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रसाद व अमृता यांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे काही फोटोज अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. तर प्रसादच्या दोन्ही हातांवर ‘अमृतमय जाहलो’ असं मेहंदीने लिहिण्यात आलेलं पाहायला मिळालं. चाहत्यांसह कलाकारांनीही या फोटोजवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमातून एकत्र आलेल्या या जोडीमध्ये सुरुवातीला मैत्रीपूर्ण नातं होतं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

Tags: amruta deshmukhentertainmentmarathi actormarathi actressnamrata sambheraopramrutaprasad jawade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
actor gashmeer mahajani did question answers session with his followers on instagram stories

“तुझी साऊथ इंडियन गर्लफ्रेंड आहे?”, चाहत्याने गश्मीर महाजनीला विचारला थेट प्रश्न, अभिनेता म्हणाला, “तिनेच मला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.