रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशोक व निवेदिता सराफांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाची करुन दिली ओळख, म्हणाल्या, “आमचा मिशीवाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 17, 2023 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress nivedita saraf shared photo with ashok saraf and pet on social media

अशोक व निवेदिता सराफांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाची करून दिली ओळख; म्हणाल्या, "आमचा मिशीवाला..."

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे अभिनय क्षेत्रात कार्यरत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. निवेदिता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अनेक आठवणी, किस्से व फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच त्यांनी आता एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Actress Nivedita Saraf Shared Photo With Pet)

निवेदिता यांनी त्यांच्या पेटबरोबरचा एक फोटो सोशल मोडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी “आमचा मुंछ वाला नाही पण पुंछ मुलगा हजर आहे” असं म्हटलं आहे. याचं कारण यंदाच्या दिवाळीत त्यांचा मुलगा अनिकेत हजर राहू शकला नाही. अनिकेत हा शेफ असून तो परदेशात असतो. त्यामुळे त्याला यंदाच्या दिवाळीत भारतात येणं शक्य झालं नाही. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. अनिकेत सोशल मीडियावर सक्रीय असून वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे फोटोज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! अमृताच्या हातावर रंगली प्रसादच्या नावाची मेहंदी, थाटामाटात पार पडला सोहळा

दिवाळी सणानिमित्त अनेक आत्पेष्ट, नातेवाईक व कुटुंबीय घरी येत असतात. पण अनिकेत यंदाच्या दिवाळीत हजर राहू शकला नाही. पण निवेदिता यांचा दुसरा मुलगा अर्थात त्यांचा पेट सनी यावेळी हजर होता. त्यांच्या पेटला त्यांनी दुसरा मुलगा मानलं आहे. त्यांच्या या पेटचं नाव त्यांनी ‘सन्नी’ असं ठेवलं आहे. सन्नीला त्यांनी त्यांच्या घरातील एक सदस्यचं मानलं आहे. यावरून सराफांचं प्राणीप्रेम दिसून येत आहे. निवेदिता यांनी अनेकदा त्यांच्या पेटबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले आहेत.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा मृदगंध जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, नंदेश उमप यांनी केली घोषणा

दरम्यान, निवेदिता सराफ या सोशल मीडियावरुन कायमच फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो-व्हिडिओला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स येत असतात. अशातच निवेदिता यांनी शेअर केलेल्या या फोटोलादेखील चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला आहे.

Tags: ashok sarafentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentnivedita saraf
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tiger 3 box office collection day 5

Tiger 3 Movie : सलमान खानच्या 'टायगर ३'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाच दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.