रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Suyyash rai response on avneet kaur video

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण...”

पापाराझी छायाचित्रकारांची क्रेझ गेल्या काही वर्षांपासून अधिक वाढलेली दिसते. बी-टाऊनमधील कित्येक कलाकारांचे विविध लूक, त्यांची लाइफस्टाइल पापाराझींमुळे समोर येते. सोशल मीडियावर तर पापाराझींनीच शूट केलेल्या व्हिडीओंचा सुळसुळाट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. काही कलाकार तर स्वतःहून पापाराझींना ते असतात त्या ठिकाणी बोलावून घेत असल्याचंही निदर्शनास आलं. सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी वाढवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. पण याचे तोटेही तितकेच आहेत. अलिकडे मर्यादा ओलांडून पापाराझी कलाकारांचे व्हिडीओ शूट करत असल्याचं बोललं जातंय. असाच प्रकार आता अभिनेत्री अवनित कौरबरोबर घडला. (Suyyash rai response on avneet kaur video)

अवनितने नुकतीच एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. ती जेव्हा रेड कार्पेटवर फोटोशूटसाठी उभी राहिली तेव्हा अनेकांनी अवनितला घेरलं. पापाराझी फोटोग्राफर्सनेही तिचे व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. मात्र कॅमेऱ्या तिच्या स्तनांकडे अधिक झूम करत त्यांनी व्हिडीओ शूट केला. इतकंच काय तर तो व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरही पोस्ट केला. याच प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुयश रॉय चांगलाच भडकला. त्याने पापाराझींना अनेक प्रश्न करत चांगलंच खडसावलं आहे.

आणखी वाचा – दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुयश म्हणाला, “कॅमेरा झूम का केला?. तुम्ही आता अजून आतमध्ये घुसा. हो ती खूप सुंदर दिसत आहे. पण तुम्ही मीडिया म्हणून येता आणि हे काय करत आहात?. शिष्टाचार, नैतिकता, मुल्य, आयुष्य हे सगळं कुठे गेलं?. तुमच्या घरातील स्त्रिया या सगळ्या कृत्याशी सहमत असतील असं वाटत नाही. हे खरंच खूप हे खरंच खूप दुखद आहे”. सुयशने अवनितचा व्हिडीओ पाहताच संताप व्यक्त केला. त्याला राग अनावर झाला. पापाराझी छायाचित्रकारांना त्यांने चांगलंच सुनावलं. शिवाय नेटकऱ्यांनीही सुयशला सहमती दर्शवली.

View this post on Instagram

A post shared by Suyyash Rai (@suyyashrai)

आणखी वाचा – १४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

View this post on Instagram

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

फोटोग्राफर्स, पापाराझींनी आपली मर्यादा ओलांडून शूट न करण्याचा सल्ला अनेकांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे. फोटोग्राफर्सला बेल्ट ट्रिटमेंटची गरज आहे. जो अशाप्रकारे झूम करुन शूट करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती खूप सुंदर दिसत आहे पण मग तुम्हाला असं शूट करण्याची गरज काय?, तुम्हाला हे कृत्य करताना लाज वाटत नाही का?. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत फोटोग्राफर्सला सुनावलं. पण याविरोधात आवाज उठवल्यानंतरही पापाराझींचं वागणं बदलणार का?, की पूर्वीसारखंच उद्देश लक्षात ठेवून शूट करत राहणार हा प्रश्नच आहे.

Tags: bollywood actressbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Riteish Deshmukh Net Worth

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.