बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. धमाकेदार ॲक्शन सीन्स व सलमान-कतरिनाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं असून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. एकीकडे दिवाळी सण आणि क्रिकेट विश्वचषकाच्या सामने सुरु असतानाही चित्रपट कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे. अशातच चित्रपटाच्या पाच दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले असून चित्रपट आता ३०० कोटींचा आकडा पार करण्यापासून काही पावलं दूर आहे. (Tiger 3 box office collection day 5)
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सलमानच्या ‘टायगर ३’ने पाचव्या दिवशी केवळ १८.५० कोटींची कमाई केली. तर देशभरात पाच दिवसांत १८७.६५ कोटींचा आकडा चित्रपटाने पार केला. जगभरातील बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनचा विचार करता, सलमानच्या चित्रपटाने चार दिवसांत २७० कोटींची कमाई केली असून पाचव्या दिवसाअखेर हा आकडा ३०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा – अशोक व निवेदिता सराफांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाची करुन दिली ओळख, म्हणाल्या, “आमचा मिशीवाला…”
‘टायगर ३’च्या चार दिवसांच्या कमाईवर थोडीशी नजर टाकली असता, चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई करत सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा थेट ५९ कोटींपर्यंत पोहोचला. पण, तिसऱ्या दिवसांपासून चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या दिवशी ४४ कोटींची, चौथ्या दिवशी २१.१ कोटींची, तर पाचव्या दिवशी १८.५० कोटींची कमाई केली. म्हणजे, पाच दिवसांत चित्रपटाने देशभरात १८७.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपटाने जगभरात २७० कोटींची कमाई केली असून लवकरच तो ३०० कोटींचा टप्पा गाठणार आहे.
हे देखील वाचा – “भांडी घासली, बेसिनही साफ केलं अन्…”, ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “बाथरुमचं…”
‘टायगर ३’ हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’चा सिक्वेल असून ज्यात सलमान खान, कतरिना कैफ व इमरान हाशमी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. त्याचबरोबर, हृतिक रोशन व शाहरुख खान यांची देखील झलक यात पाहायला मिळत आहे. धमाकेदार ॲक्शनपॅक सीन्सने भरलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांसह प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.