मराठी टीव्ही विश्वातील लाडकी जोडी प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आपलंसं करणारी ही क्युट जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमातून प्रसाद व अमृता एकत्र आले. ज्यात त्यांनी त्यांच्या खेळीने व मैत्रीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या कार्यक्रमानंतर दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. काही दिवसांपूर्वी दोघांच्या साखरपुडा व केळवणाचा कार्यक्रम पार पडला असून आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. (Amruta Deshmukh & Prasad Jawade Mehandi Ceremony)
प्रसाद-अमृता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाअगोदरच्या विधींना काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. नुकतंच दोघांच्या ग्रहमख विधी पार पडला असून आता मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांच्या मेहंदी कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे काही फोटोज अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ज्याला “सौंदर्याची अमर परंपरा म्हणजे मेहंदी. मी माझ्या मेहेंदीसाठी ४ तास घालवले आणि प्रसादने त्याच्या हातावर कोरलेली मेहंदी दाखवली.” असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा मृदगंध जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, नंदेश उमप यांनी केली घोषणा
समोर आलेल्या या फोटोमध्ये ही जोडी पारंपरिक अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. अमृताने यावेळी पिवळ्या रंगाचा लेहंगा त्यावर फुल व मोत्यांपासून बनलेले सुंदर दागिने परिधान केले. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर प्रसादने हिरव्या रंगाचा डिझायनर कुर्ता यावेळी परिधान केला, ज्यामध्ये तो अगदी शोभून दिसतो.
हे देखील वाचा – “विकी भैय्याचा अहंकार…”, अंकिता लोखंडे-विकी जैनच्या नात्यावर देवोलीना भट्टाचार्जीचं मोठं भाष्य, म्हणाली, “खालच्या पातळीवर…”
त्याचबरोबर, या समारंभातील आणखी काही सुंदर क्षण देखील समोर आले. ज्यामध्ये अमृताच्या हातावर आकर्षक मेहंदी कोरण्यात आली. तर प्रसादच्या दोन्ही हातांवर ‘अमृतमय जाहलो’ असं लिहिण्यात आलं आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांच्या या मेहंदी सोहळ्याचे फोटोज जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह कलाकारांनीही या फोटोजवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने “मी प्रत्यक्ष तिथे नव्हते, पण मनाने मी होते. किती गोड दिसतात हे दोघे”, अशी कमेंट केली. तर अनेक नेटकरी कमेंट्सद्वारे या जोडप्याचं कौतुक करत आहे. एकूणच या सोहळ्याच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत.