मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे अभिनय क्षेत्रात कार्यरत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. निवेदिता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. अनेक आठवणी, किस्से व फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच त्यांनी आता एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Actress Nivedita Saraf Shared Photo With Pet)
निवेदिता यांनी त्यांच्या पेटबरोबरचा एक फोटो सोशल मोडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी “आमचा मुंछ वाला नाही पण पुंछ मुलगा हजर आहे” असं म्हटलं आहे. याचं कारण यंदाच्या दिवाळीत त्यांचा मुलगा अनिकेत हजर राहू शकला नाही. अनिकेत हा शेफ असून तो परदेशात असतो. त्यामुळे त्याला यंदाच्या दिवाळीत भारतात येणं शक्य झालं नाही. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. अनिकेत सोशल मीडियावर सक्रीय असून वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे फोटोज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! अमृताच्या हातावर रंगली प्रसादच्या नावाची मेहंदी, थाटामाटात पार पडला सोहळा
दिवाळी सणानिमित्त अनेक आत्पेष्ट, नातेवाईक व कुटुंबीय घरी येत असतात. पण अनिकेत यंदाच्या दिवाळीत हजर राहू शकला नाही. पण निवेदिता यांचा दुसरा मुलगा अर्थात त्यांचा पेट सनी यावेळी हजर होता. त्यांच्या पेटला त्यांनी दुसरा मुलगा मानलं आहे. त्यांच्या या पेटचं नाव त्यांनी ‘सन्नी’ असं ठेवलं आहे. सन्नीला त्यांनी त्यांच्या घरातील एक सदस्यचं मानलं आहे. यावरून सराफांचं प्राणीप्रेम दिसून येत आहे. निवेदिता यांनी अनेकदा त्यांच्या पेटबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले आहेत.
दरम्यान, निवेदिता सराफ या सोशल मीडियावरुन कायमच फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो-व्हिडिओला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स येत असतात. अशातच निवेदिता यांनी शेअर केलेल्या या फोटोलादेखील चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला आहे.