रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2025 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Usha Nadkarni life

“काम करता करता मला मरण हवं कारण...”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि...

एकटेपणाने आयुष्य जगण्याचा मार्ग कोणीही आनंदाने निवडत नाही. एकटेपणा वाट्याला आला की, परिस्थितीनुसार आनंदाने स्वीकारावा लागतो. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याबाबत घडलं आहे. वयाच्या ७९व्या वर्षीही त्या घरात एकट्याच राहतात. भाऊ, बहीण साथीला होते. मात्र त्यांचंही निधन झालं. उषा यांचा मुलगाही त्यांच्याजवळ राहत नाही. तो त्याच्या संसारात सुखी आहे. उषा मात्र पैसा, प्रसिद्धी असूनही एकट्याने आयुष्य जगत आहेत. याबाबतची खंत त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली. उतरता वयात हा एकटेपणा आणखीनच त्यांना अंगावर येतो. मात्र याबाबत जराही तक्रार न करता सगळं त्यांनी आनंदाने स्वीकारलं आहे. (Usha Nadkarni life)

उषा यांनी सुमन म्युझिक मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “अलिकडचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. महेंद्र कपूर यांच्यासाठी एकाने कार्यक्रम केला होता. कार्यक्रम आयोजित करणारी माणसं माझ्या घरी आली होती. त्यांनी मला म्हटलं की, तुम्हाला कलारत्न पुरस्कार देणार आहोत तर तुम्ही कार्यक्रमाला या. मुलाला म्हटलं मी तू माझ्याबरोबर चल ना कार्यक्रमाला. तर तो मला म्हणाला, आई माझ्या मुलीला सांभाळायला येणारी बाई आज नाही आहे तर तिला सोडून कसा येऊ?. मग मी एकटीच गेले. Uber करुन चर्चगेटला गेले. वाय बी चव्हाणलाच कार्यक्रम होता”.

आणखी वाचा – इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

View this post on Instagram

A post shared by Usha Nadkarni???? (@usha__nadkarni)

“तिथे मी खुर्चीत बसले. माझं नाव कार्यक्रमात घेतलं गेलं आणि मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी खुर्चीतून उठले. पण मला भीती वाटली की, मी खाली पडेन. समोर एक मुलगा उभा होता त्याला मी म्हटलं की, मला जरा हात देतोस का?. मग तो मुलगा मला स्टेजपर्यंत घेऊन गेला. स्टेज चढायला जाणार तर सुदेश भोसले मला धरण्यासाठी धावत आला. मग असं मला जरा वाईट वाटतं. मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी काम करणार. माझं तर म्हणणं आहे की, मला काम करताना मरण आलं पाहिजे. त्यातच मला मज्जा येईल”.

आणखी वाचा – Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

“आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको. आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको. आणि लोक आपल्यासाठी करतात हे बघून मला वाईट वाटायला नको. म्हणजे मी आजारी पडले तर माझ्या मुलाला त्रास होणार. मग तो त्याच्या बायको-मुलीला बघणार की मला बघणार?. माझ्या बाजूच्या बंगाली आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की, आंटी तुम्हाला कधी काही झालं तर लाजायचं नाही. रात्री-अपरात्री कधीही फोन करायचा”. उषा यांचं आनंदात एकटं राहणं स्वीकारणं खरंच कौतुकास्पद आहे.

Tags: bollywood newsentertainment newsUsha Nadkarni
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Dipika Kakkar  liver cancer know its Symptoms 

चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.