दीड महिन्यांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक, कलाकार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून चित्रपटगृहांमध्ये त्याच उत्साहात आजही चित्रपट सुरु आहे. (Raj Thackeray on Baipan Bhari Deva)
अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी नुकताच हा चित्रपट सचिन तेंडुलकरसोबत पाहिला होता. त्यानंतर चित्रपटाचे भरभरून कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाहा काय म्हणाले राज ठाकरे ? (Raj Thackeray on Baipan Bhari Deva)
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून व्हिडिओमध्ये राज ठाकरे म्हणले, “त्यादिवशी मी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंतर घरी आलो आणि पत्नीशी बोललो की, हा चित्रपट केवळ बायकांनी पाहायचा नाही, तर पुरुषांनीदेखील पाहायचा चित्रपट आहे. कारण, या चित्रपटातून त्या महिला कशाकशातून जात असतात, याचे सुंदर वर्णन केलं आहे. मला असं वाटतंय की, पुरुषांनी महिलांची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची जास्त गरज आहे. केवळ महिलांनी, त्या माता-भगिनींनी जाऊन ते स्वतःला रिलेट करून घेणं नाही. तर त्यातील काही चुकीच्या गोष्टी असतील, तर त्या दुरुस्त करून बाजूला काढणे हे प्रत्येक पुरुषांनी पाहणे जास्त गरजेचे आहे. या चित्रपटाच्या यशामागे चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन आणि केदार शिंदे व त्यांच्या टीमचं आहे.”, असे राज ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणाले. (Raj Thackeray on Baipan Bhari Deva)
माननीय राजसाहेब ठाकरे यांची "मनसे" प्रतिक्रिया.. #बाईपणभारीदेवा सिनेमा पाहिल्यावर त्यांचं म्हणणं तेच आहे, जे मी सिनेमा सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे. @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/4HYDRKnCj5
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) August 10, 2023
हे देखील वाचा – फक्त १०० रुपयांत पाहता येणार ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, नेमकं कधी, कुठे आणि कसं?
राज ठाकरेंचा हा व्हिडिओ पोस्ट करताना केदार यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आणि म्हणाले, “‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यावर राज ठाकरे यांचं तेच म्हणणं आहे, जे मी चित्रपट सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे.” याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले.
हे देखील वाचा – “ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी…” सचिन तेंडुलकर कडूनही ‘बाईपण भारी देवाचं’ कौतुक, खास पोस्ट लिहीत म्हणाला “मी, माझी आई व मावशी…”
केदार यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने ९० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.