‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. या चित्रपटातून प्रार्थनाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. याशिवाय प्रार्थनाने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अश्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. प्रार्थनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचा चाहता वर्ग निर्माण केला. चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर प्रार्थनाने छोटा पडदा देखील गाजवला. प्रार्थनाच्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मालिकेत ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली. मालिकेतील तिचा लूक आणि वागणं-बोलणं पाहून अनेकांना आपली मुलगी, सून अशीच असावी असं वाटायचं. प्रार्थनाचं हसणं हे अगदीच वेगळं आणि आकर्षक आहे.
पाहा-प्रार्थना बेहेरच्या फोटोशूटचं कलाकारांनी केलं कौतुक
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते. बरेचदा रिल्स, फिटनेसचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते दिवाने आहेत. अनेकदा वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये ती फोटोशूट करत असते. प्रार्थनाने नुकतंच एक रील इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. नऊवारी साडी, सुंदर दागिने आणि तिच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्या पोस्टला तिने कॅप्शन देत म्हंटल आहे , ‘बाई गं कसं करमत न्हाई गं…’.
हे देखील वाचा: ‘या’ विषयामध्ये मास्टर्स करतेय सायली संजीव, परीक्षाही झाली सुरु, अभ्यास करतानाचा फोटो केला शेअर
सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच एकमेकांचं कौतुक करत असतात. बऱ्याच कलाकारांनी प्रार्थनाच्या सौंदर्याचं ही कौतुक केलं आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याने लाईक करत कमेंट केली आहे, ‘मॅडम… मतलब बोलती ही बंद मॅडम ‘ अशी कमेंट श्रेयसने केली आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘You gorgeous ‘ त्याचबरोबर इतर कलाकारांनी आणि चाहत्यांनी ‘Beautiful’ अश्या बऱ्याच कमेंट केल्या आहेत. प्रार्थना दिसायला सुंदर आहेच त्यामुळे तिचे फोटो देखील कमाल येतात.
अनेक चित्रपटात प्रार्थनाने सोज्वळ भूमिका साकारत सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिचा फॅनक्लब वाढतच गेला. तिच्या गोड आवाजाने, अभिनयाने ती सगळ्यांना भुरळ घालते. झी मराठी वाहिनीवरील ‘एका पेक्षा एक अप्सरा’ या कार्यक्रमामुळे प्रार्थना नृत्यांगणा म्हणून पुढे आली. प्रत्येक गोष्टीत नेहमीच अग्रेसर असणारी प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात.
हे देखील वाचा: “कितीला विकत घेतलं?” इन्स्टाग्रामला ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर विशाखा सुभेदार ट्रोल, अभिनेत्री म्हणते, “गीतेवर हात ठेवून…”