Mumbai Police On Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळ्पास दिड महिना उलटून गेला आहे तरी चित्रपटगृहांमध्ये त्याच उत्साहात आजही चित्रपट सुरु आहे.परंतु ज्यांच्यामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद सामान्य माणसाला घेता येतो ते म्हणजे पोलीस कर्मचारी. त्यांच्यामुळे सामान्य माणूस सुरक्षित आयुष्य जगत असतो. परंतु पोलिसांच्या या धकाधकीच्या जीवनात त्यांना निवांतपणा कधी मिळणार (Mumbai Police On Baipan Bhari Deva)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तो वेळ काढायला लावला.मुंबई पोलीस झोन ५ ( माहीम) चे डीसीपी श्री मनोज पाटील यांनी आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी ‘बाईपण भारी देवा’चा स्पेशल शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते व सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे उपस्थित होते.
पाहा काय म्हणाले पोलीस अधिकारी? (Mumbai Police On Baipan Bhari Deva)
चित्रपटाच्या टीम चे अभिनंदन करत डीसीपी मनोज पाटील म्हणाले, “आमचे एसीपी श्री कुरंदकर यांनी पुरुषांना ही फिल्म दाखवावी अशी छान कल्पना सुचवली. पोलिसांना सणवार, सुट्ट्या नसतातच, पोलीस जास्तीत जास्त वेळ बाहेरच असतात आणि अशा वेळेस त्यांच्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने काळजी ही त्यांची पत्नी किंवा घरातील स्त्री घेते. पण हे करताना तिच्या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्याला माहितीच नसतात आणि म्हणूनच त्याची जाणीव करून देण्यासाठी हा चित्रपट दाखवण्याचा उद्देश्य होता. त्यांना वाटतं सर्व पुरुष पोलिसांनी हा चित्रपट जरूर पहावा. ज्यामुळे जेव्हा महिला पोलिस स्टेशनला येतील तेव्हा त्यांच्या अडचणी पुरुष कर्मचारी अजून चांगल्या पद्धतीने सोडवू. एवढा उत्कृष्ट चित्रपट महाराष्ट्राला आणि समाजाला दिला त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार”

हे देखील वाचा : सचिन तेंडुलकरने व्हिडिओ कॉलद्वारे केलं दीपा परबचं कौतुक,पोस्ट शेअर करत दीपा म्हणाली “चित्रपटाने भरपूर काही दिलंय पण….”
केदार शिंदे म्हणाले, “100 डायल केलं तर मदतीसाठी पोलिस हजर होतात! काल 100 पोलिस “बाईपण भारी देवा” सिनेमा पाहण्यासाठी हजर होते. दिवसरात्र आपल्या सेवेत असलेले काल २ तास आनंदात होते. सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान खुप काही देऊन गेलं. पुरूषांनी हा सिनेमा पाहायला हवा.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. आता पुरूषांची गर्दी नक्कीच होईल. आपल्या आवडत्या स्त्री सोबत सिनेमा पहायला!”अनेक स्तरातून चित्रपटाचं कौतुक होत आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी देखील चित्रपट पाहिला व कौतुक केलं (baipan bhari deva)