मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डस् मोडले असून सिनेमाची ही घोडदौड अजूनही सुरूच आहे. सिनेमाने आतापर्यंत ९० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ नंतरचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. (Baipan Bhari Deva)
सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने केवळ राज्यातीलच नाही, तर जगभरातील महिला प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन महिनाभराचा काळ लोटला, मात्र या चित्रपटाची क्रेझ आद्यपही कायम आहे. त्याचबरोबर कलाकारांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीसुद्धा ‘बाईपण भारी देवा’चे भरभरून कौतुक केले.
हे देखील वाचा – “ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी…” सचिन तेंडुलकर कडूनही ‘बाईपण भारी देवाचं’ कौतुक, खास पोस्ट लिहीत म्हणाला “मी, माझी आई व मावशी…”
एकीकडे ‘बाईपण भारी देवा’ला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रेक्षकांना ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट येत्या ११ ऑगस्टपासून अवघ्या १०० रुपयांत सर्वच चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
हे देखील वाचा – ‘बाईपण भारी देवा’चा दुसरा भाग येणार? केदार शिंदेंच्या पोस्टने वेधले लक्ष
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टवर एक फोटो शेअर करून त्यांनी म्हटलंय, “‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा “तिने” डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तिचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तिचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय….” ‘बाईपण भारी देवा’ हा दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ नंतर यंदाचा सलग दुसरा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. (Baipan Bhari Deva)