मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाट असणाऱ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’. साधारण महिन्याभरण्यापूर्वी प्रदर्षित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने लौकीक मिळवला. ६ महिलांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली विशेष करून महिलांना. रितेश देशमुखच्या ‘वेड’ ला मागे टाकत या चित्रपटाने दुसऱ्या क्रमांकाचे पद पटकावले. १ महिना उलटून गेल्यानंतरही चित्रपटाची क्रेझ आद्यपही कमी झालेली दिसत नाहीये.(Sachin Tendulkar on Baipan Bhari Deva)
विविध स्तरातून “बाईपण भारी देवा” चित्रपटाचं कौतुक होतं असताना आता मास्टर ब्लास्टर म्हणून जगप्रसिद्ध असणारा मराठमोळा क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील “बाईपण भारी देवा” या चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. नुकताच सचिन तेंडुलकरने “बाईपण भारी देवा” चित्रपटाचा आनंद घेतला आणि ट्विट करत चित्रपटाचं कौतुक देखील केलं. ट्विट करत सचिन म्हणाला “बाईपण भारी देवा” ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला आणि मी माझी आई आणि मावशी सुद्धा हा चित्रपट कधी पाहतायत याची मी वाट बघतोय. शिवाय, चित्रपटातील कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता!”(sachin tendulkar post for baipan bhari deva)
Falling apart only to grow closer, 'बाईपण भारी देवा' is a touching story about 6 sisters. I really enjoyed watching this Marathi movie and I can’t wait for my mother and aunt to watch it too. Plus, meeting the cast was a lovely experience! pic.twitter.com/6JFVEohjjQ
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 6, 2023
हे देखील वाचा- ‘बाईपण भारी देवा’चा दुसरा भाग येणार? केदार शिंदेंच्या पोस्टने वेधले लक्ष
सचिन तेंडुलकरने देखील केदार शिंदे यांच्य्या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एका चित्रपटाबद्दल भावना मांडताना सचिन तेंडुलकर देखील भारावलेला दिसून आला. तसेच या चित्रपटही कलाकारांना भेटून देखील आनंद झाल्याचं त्याने सांगितलं.