मालिका या प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. मालिकेमुळे कलाकार मंडळींवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. प्रत्येक मालिकेतील कलाकार हे त्यांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करतात. टीआरपीच्या शर्यतीत तर या मालिकांची जुगलबंदी सुरु असते. अशातच झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. (Kashyap Parulekar On Pallavi Patil)
‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील कलाकारही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर व अभिनेत्री पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कश्यप व पल्लवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सगळ्यांनाचं भावते. ऑनस्क्रीन या जोडीमध्ये होणारी लुटुपुटुची भांडण ही ऑफस्क्रिनही होतं असतात. राघव व आनंदी हे पात्र ते या मालिकेत साकारत आहेत.
राघव व आनंदीने आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच या जोडीच्या एका व्हिडीओने हसू आवरेना झालं आहे. कश्यप पल्लवीला चारचाकी गाडी चालवायचे धडे देत असतो. कश्यप पल्लवीला ‘चालवा’ असं सांगतो, तेव्हा पल्लवी ऍक्टिंग करत तोंडाने गाडीचा आवाज काढत गाडी चालवू लागते, हे पाहून कश्यप तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागतो. त्याचा हा धमाल करतानाचा व्हिडीओ कश्यपने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करत शेअर केला आहे.
राघव व आनंदी ही जोडी सध्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेली पाहायला मिळत आहे. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेचं खेळीमेळीचं कथानक प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करत आहे. तर राघव व आनंदीसह मालिकेतील इतरही कलाकार मालिकेत त्यांची उत्तम भूमिका निभावत आहेत.