झी मराठीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे. अल्पावधीतच या मालिकेने व शरयूने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिची ‘पारू’ ही भूमिका सध्या विशेष गाजत असून या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आपल्या भूमिकेने चर्चेत राहणारी अभिनेत्री शरयू सोनावणे सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. अशातच तिने काल (३ मे) शेअर केलेल्या फोटोने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
शरयूने काल तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही खास फोटो शेअर केले. ३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत”असं म्हणत तिने लग्नाचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मंगळसूत्राचीही खास झलक पाहायला मिळाली. शरयूने तिच्या लग्नात खास आकर्षक असं मंगळसूत्र परिधान केल्याचं पाहायला मिळालं.
शरयूच्या गळ्यातील मंगळसूत्रात सोन्याचे स्थान अधिक असले तरी त्यात काळ्या मण्यांनाही तिने तितकेच स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरयूचे मंगळसूत्र मॉडर्न जरी असले तरी त्याला पारंपरिकतेचाही साज असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या मंगळसूत्रात दोन डवल्यादेखील आहेत, ज्यापैकी एकामध्ये हळद व दुसऱ्यामध्ये कुंकू लावले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या मंगळसूत्राला सोन्याच्या चैनीची सुंदर अशी डिझाईनही आहे. त्यामुळे शरयूच्या गळ्यातील मंगळसूत्र हा तिच्या लग्नातील मुख्य आकर्षण ठरत आहे.
आणखी वाचा – नऊवारी साडी, आकर्षक दागिने अन्…; स्वत:च्या लग्नामध्य अशी नटली होती पारू, वर्षभरानंतर शेअर केले खास फोटो
दरम्यान, शरयूने तिच्या लग्नात लाल रंगाची सुंदर नक्षीकाम असलेल्या काठाची भरजरी पैठणी परिधान केली होती आणि त्यावर हिरव्या रंगाचा नक्षीकाम असलेला शेलाही घेतला होता. तर तिचा नवरा जयंतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर लाल रंगाचे धोतर व लाल रंगाचा शेला परिधान केला होता. दरम्यान, हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला मुंडावळ्या आणि लूकला साजेश्या साजशृंगारामुळे अभिनेत्रीचे सौंदर्य खूपच खुलून आले होते.