‘बॉलिवूडचा किंग’ अशी ओळख असलेला कलाकार म्हणजे अभिनेता शाहरुख खान. शाहरुखने वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाची खास झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चर्चा सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटातील शाहरुखचा लुकदेखील शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Shah Rukh Khan And Tapsee Pannu’s First Song Lutt Putt Gaya)
नुकतंच या चित्रपटातील ‘लुट पुट गया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्याची सध्या सोशल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. संगीतकार प्रीतम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गायक अरिजीत सिंहने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. गीतकार स्वानंद किरकिरे व आय. पी. सिंह यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहे. तर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
‘लुट पुट गया’ हे एक प्रेमगीत आहे. गाण्यात शाहरुख व अभिनेत्री तापसी पन्नू यांची खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्यात शाहरुख तापसीच्या प्रेमात पडताना दिसत आहे. त्यामुळे त्यांची खास केमेस्ट्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर गाण्यातील शब्द, चाल व नृत्यामुळे हे गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल. दरम्यान सोशल मीडियावर हे गाणं सध्या व्हायरल होत आहे. गाण्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स् व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा ड्रायव्हर तिच्यावर नेमका का वैतागलाय? पोस्ट शेअर करत केला खुलासा, म्हणाली…
‘डंकी’ या सिनेमात शाहरुख, तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, व सलमान खान आदि कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २२ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.