शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर रुपालीचा डाव तिच्यावरच उलटला, केतकी-फाल्गुनी विरोचकाच्या रुममध्ये सापडल्यानंतर नेत्राला यश, नवा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
मे 4, 2024 | 11:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update new twist

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर रुपालीचा डाव तिच्यावरच उलटला, केतकी-फाल्गुनी विरोचकाच्या रुममध्ये सापडल्यानंतर नेत्राला यश, नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस पाहण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. अनेक उत्कंठावर्षक व रहस्यमय कथानकाने छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने सर्वांची मनं जिंकली आहेत. मालिकेत येणारे नवनवीन ट्विटस हीच या मालिकेची जमेची बाजू आहे.

अशातच मालिकेत रुपालीने केतकी काकू व फाल्गुनी यांना संमोहित केले असल्याचे पाहायला मिळत आहेत. संमोहित झाल्याने त्या दोघी वाटेल ते करत आहेत. संमोहित झाल्यामुळे फाल्गुनी व केतकी काकू स्वयंपाक घरातील सर्व भांडी बाहेर फेकून देतात. हातात येईल ते सामान त्या दोघी बाहेर फेकत आहेत. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी नेत्रा व इंद्राणीसह  घरातील इतर मंडळी त्या दोघींना बांधून ठेवतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अधिपतीला गाणं शिकवणारी शिक्षिका भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन त्याच्या प्रेमात पडणार का? ‘ते’ दृश्य पाहून अक्षराने नवऱ्याला खडसावलं, प्रेमाचा नवीन ट्विस्ट

यानंतर रुपाली पोलिसांना बोलावून राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध तक्रार करते. यानंतर पोलिस येऊन घराची तपासणी करतात. पोलिस प्रत्येकाच्या रूमची चौकशी करतात मात्र त्या दोघी कुणाच्याच रुममध्ये सापडत नाहीत. त्या दोघी अखेर रुपालीच्या रुममध्येच सापडतात. त्यामुळे पोलिस रुपालीला अटक करणार असल्याचे म्हणतात. पण आता ते रुपालीला अटक करणार का? की पुढे आणखी काय होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आणखी वाचा – नऊवारी साडी, आकर्षक दागिने अन्…; स्वत:च्या लग्नामध्य अशी नटली होती पारू, वर्षभरानंतर शेअर केले खास फोटो

त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार? पोलिस रुपालीला अटक करणार का? की रुपाली तिच्याकडे असलेल्या शक्तीचा वापर करुन पोलिसांनाही संमोहित करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे? तसेच मालिकेतील या घटनेमुळे कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. त्यामुळे आगामी भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
Paru fame Sharayu Sonavane attracted attention with her specially designed mangalsutra

आकर्षक डिझाईन, सोन्याचा अधिकाधिक वापर अन्...; शरयू सोनावणेने डायमंडचा वापर न करता असं बनवून घेतलं मंगळसूत्र, डिझाईन आहे फारच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.