शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रेम, जबरदस्त ऍक्शन, हाणामारी अन्…” रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरने घातलाय धुडगूस, पण भाव खाऊन गेली बॉबी देओलची भूमिका

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 23, 2023 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Animal Trailer

"प्रेम, जबरदस्त ऍक्शन, हाणामारी अन्…" रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या ट्रेलरने घातलाय धुडगूस, पण भाव खाऊन गेली बॉबी देओलची भूमिका

काही दिवसांपासून सिनेसृष्टीत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे रणबीर कपूरही चर्चेत राहिला. या चित्रपटातील रणबीर कपूरचं रौद्र रूप आता समोर आलं आहे. कारण रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाचं काही दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरु आहे. अशातच चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली यानंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरने ही उत्सुकता अधिक ताणली आहे. (Animal Trailer)

आपल्या वडिलांनाच आपला आदर्श मानणारा, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा एका गुन्हेगार मुलांचं त्याच्या वडिलांशी असलेलं नातं हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं असल्याचं ट्रेलरवरून कळतंय. संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून तो केलेल्या कल्पनेइतका तीव्र आहे. ट्रेलरमध्ये रणबीर कपूरचे वडील बलबीर(अनिल कपूर यांनी साकारलेले पात्र) यांच्याबरोबरचे त्याचे अस्वस्थ नाते आणि ते बदलणारे नाते दाखविण्यात आलं आहे. रणबीरचं खलनायकी पात्र हे त्याच्यात त्याच्या घरापासूनच आलं आहे. कारण त्याच्या कुटुंबाचं गुन्हेगारी विश्वाशी काहीतरी कनेक्शन असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. चित्रपटात हळव्या नात्यासह जबरदस्त ऍक्शन, प्रचंड हाणामारी, हिंसा पाहायला मिळणार असल्याचंही दिसतंय.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा ड्रायव्हर तिच्यावर नेमका का वैतागलाय? पोस्ट शेअर करत केला खुलासा, म्हणाली…

चित्रपटात रश्मिका मंदाना रणबीर कपूरच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती या चित्रपटात गीतांजली ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटात रश्मिकाचं पात्रही फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं दिसत आहे. शिवाय चित्रपटातील बॉबी देओलची भूमिकाही हिंसक असलेली पाहायला मिळतेय. ट्रेलरच्या अगदी शेवटी बॉबी व रणबीरची ऍक्शन सीन लक्षवेधी ठरतोय. त्यामुळे ऍक्शनपट ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. कमी वेळात या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir kapoor fanpage ???? (@ranbir_kapoooor)

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरच्या लेकींनी स्वतःच छापली ५० रुपयांची नोट, गांधीजींना पाहता नेटकऱ्यांनाही आलं हसू; म्हणाले, “RBIला …”

यापूर्वी, हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता मात्र निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यावर्षी डिसेंबरमध्ये हलवली. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, रणबीर कपूर अभिनित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Tags: anil kapooranimal movieAnimal Trailerbobby deolentertainmentranbeer kapoorrashmika manadana
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
bollywood king shah rukh khan and actress taapsee pannu dunki movie first song lutt putt gaya released)

Video : बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, गाण्यातील शाहरुख खान व तापसी पन्नूच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.