बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले, “सांगायला थोडं कठीण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 4, 2023 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
zee maathi serial 36 gunee jodi will be off air aasyush sanjeev and sagar korde shared post on social media

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले, "सांगायला थोडं कठीण…"

झी मराठी वाहिनीने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजवर वहिनीने अनेक वेगवेगळ्या विषयांवरील आशयघन मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही नवीन कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन कार्यक्रम सुरू होणार असल्यामुळे काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. अशातच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. ‘३६ गुणी जोडी’ ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेतील काही कलाकारांनी यासंदर्भात काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. (Aayush Sanjeev And Sagar Korde On Instagram)

मालिकेतील वेदांत म्हणजेच अभिनेता आयुष्य संजीव आणि सार्थक म्हणजे अभिनेता सागर कोरडे यांनी सोशल मीडियावर मालिका निरोप घेणार असल्याचे संकेत देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. वेदांत अर्थात आयुशने त्याच्या कंपनीच्या केबिनमधील एक फोटो शेअर करत “वेदांतच्या केबिनमधले शेवटचे काही क्षण! यामध्ये सर्वात जवळची होती वेदांची खुर्ची. जिने आयुष्यात मला खूप ताकद, धडे आणि काही सुंदर आठवणी दिल्या. मला या खुर्चीची व वीडब्ल्यू इन्फ्राची कायम आठवण येईल.” असं म्हटलं आहे. तर सागरने “सांगायला थोडं कठीण जातअ आहे. पण सार्थकचा प्रवास इथे संपतोय… मायबाप रसिकप्रेक्षक, झी मराठी आणि सेवेंथ सेन्स मीडिया परिवाराचे मनापासून खूप खूप आभार… लवकरच भेटुयात” असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayush Sanjeev Salunke (@aayush_sanjeev)

आणखी वाचा – लग्नाला २८ वर्ष पूर्ण होतांच नारकर कपलचं जोरदार सेलिब्रेशन, अभिनेत्री म्हणाल्या, “१० हजार २२७ दिवस…”

काही दिवसांपूर्वी या मालिकेची वेळ बदलून दुपारी दोन वाजता करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे याला विरोध केला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘झी मराठी’ने हा निर्णय मागे घेतला आणि ४ डिसेंबरपासून ‘३६ गुणी जोडी’ आधीच्या वेळेत रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. पण कलाकारांच्या पोस्टवरुन आता ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sagar Korade / सागर कोरडे (@sagarkordeofficial)

आणखी वाचा – “तुम्ही दोघींनी मला…”, लेकींच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची खास पोस्ट, म्हणाली, “आपला वेळ घालवू नका…”

दरम्यान, मालिका बंद होणार असल्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. सोशल मीडियावर “कृपया ही मालिका बंद करू नका, झी वरच्या सगळ्या मालिकांमध्ये ही मालिका उजवी होती, माझी तर अत्यंत आवडती मालिका होती, टीआरपीच्या नादात एका चांगल्या मालिकेला प्रेक्षक मुकले” अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi entertainmentzee marathi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Vishakha Subhedar On Kurrrr

"पाखरं भरारी मारायला…", 'कुर्रर्रर्र' नाटकामधून प्रसाद-नम्रताच्या एक्झिटनंतर विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत, म्हणाली, "माझ्या हाकेला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.