रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला २८ वर्ष पूर्ण होतांच नारकर कपलचं जोरदार सेलिब्रेशन, अभिनेत्री म्हणाल्या, “१० हजार २२७ दिवस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2023 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aishwarya Narkar and Avinash Narkar Wedding Anniversary

लग्नाला २८ वर्ष पूर्ण होतांच नारकर कपलचं जोरदार सेलिब्रेशन, अभिनेत्री म्हणाल्या, "१० हजार २२७ दिवस…"

मराठी सिनेसृष्टीमध्ये पडद्यावर दिसणाऱ्या जोड्यांवर प्रेक्षक अतोनात प्रेम करतात. तितकंच प्रेम हा प्रेक्षकवर्ग कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीवरही करताना पाहायला मिळतो. सध्या अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले असल्याचं पाहायला मिळालं. या नव्या जोड्यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. त्यांना पाठिंबा दर्शविला. या नव्या जोड्यांमध्ये काही एव्हरग्रीन जोड्या अशा आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या तितक्याच आवडीच्या आहेत. (Aishwarya Narkar and Avinash Narkar Wedding Anniversary)

अशीच एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. अभिनयाबरोबरच ही जोडी त्यांच्या सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. तरुण पिढीला लाजवेल असा उत्साह या जोडीचा असलेला पाहायला मिळतो. त्यांचे एकत्र ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात.

आणखी वाचा – “तुम्ही दोघींनी मला…”, लेकींच्या वाढदिवसानिमित्त क्रांती रेडकरची खास पोस्ट, म्हणाली, “आपला वेळ घालवू नका…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आजही त्यांचा तो उत्साह तसेच काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. तर काहींना त्यांचा हा उत्साह खटकतो. अनेकदा हे नारकर कपल ट्रोलींगची शिकार झालेले पाहायला मिळतात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहेमीच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवानिमित्त त्यांनी सोशल मीडियावरून खास पोस्ट शेअर केली आहे. दोघांनी एकत्र फोटो, व्हिडीओ शेअर करत ““आमच्या सुखी वैवाहिक आयुष्याचे १० हजार २२७ दिवस” असं कॅप्शन या व्हिडीओ, फोटोला दिलं आहे. तसेच “२८ वर्ष एकत्र” असंही कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – विशाखा सुभेदारच्या नाटकातून अखेर नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकरची एक्झिट, त्यांच्याजागी झळकणार ‘हे’ दोन नवे चेहरे

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मालिकेतील रुपाली या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भभरून प्रेम मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश दोघेही त्यांच्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेतात. त्यांच्या योगाचे देखील व्हिडीओ ते नेहमीच शेअर करताना दिसतात.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar and Avinash Narkar Wedding Anniversaryavinash narkarentertainmentmarathi actormarathi actressmarathi serialnarkar couple
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
zee maathi serial 36 gunee jodi will be off air aasyush sanjeev and sagar korde shared post on social media

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले, "सांगायला थोडं कठीण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.