अभिनेत्री विशाखा सुभेदार हिच्या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नाटकांत काहीतरी बदल होणार या आशयाची पोस्ट विशाखा हिने शेअर केली होती. तेव्हापासून नेमका कोणता बदल असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत या नव्या बदलाबाबत पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवरून आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नाटकातून दोन मुख्य कलाकाराची एक्झिट यावर अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली. (Vishakha Subhedar On Kurrrr)
काल अभिनेत्रीने तिच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करत, “’कुर्रर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर व नम्रता आवटे संभेराव यांची एक्झिट. पहा कोणते दोन कलाकार प्रेक्षकांच्या कानात कुर्रर्रर्रर्र करण्यासाठी सज्ज आहेत?” असं म्हणत पोस्ट शेअर करत दोन नवे चेहरेही दाखवले आहेत. या पोस्टवरून सर्वत्र खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातून नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांची एक्झिट झाली असून याजागी अभिनेत्री मयुरा रानडे व अभिनेता प्रियदर्शन जाधव हे कलाकार दिसणार आहेत.
या नव्या कलाकारांच्या स्वागतासाठी विशाखाने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, “Show must go on. कलाकारांना उत्तम संधी मिळायलाच हवी. त्यांनी मोठं होणं हा कलेचा वारसा जपण्यासारखं आहे. पण तरीही एखादी कलाकृती तिचं नशीब घेवून येते. बाकी आम्ही सगळे निमित्तमात्र. काही पाखरं भरारी मारायला उडून गेली. हरकत नाही पण शो मस्ट गो ऑन. काही प्रिय मित्रांना हाक मारली त्यांनी साथ दिली म्हणून प्रयोग सुरुळीत ठेवता येत आहेत. माझ्या हाकेला धावून आलेला माझा मित्रसखा प्रियदर्शन जाधव आणि मैत्रसखी मयुरा रानडे. मित्रानो तुमच्या साथीसाठी आभार” असं म्हणत त्यांचे आभार मानले आहेत.
यापुढे विशाखाने लिहिलं आहे की, “नाटक सुरु राहायला हवं म्हणून त्याची ही धडपड ही वाखाणण्याजोगी आहे. तर मंडळी हाच बदल आहे. आतापर्यंत तुम्ही नाटकावर प्रेम केलं त्याबद्दल तुमचे आभार पण यापुढे ही कयम सोबत रहा. नाटक बघायला या. आणि नाटक पाहिलं असेल तरीही वेगळ्या संचाच नाटक बघायला या. खात्री आहे नाटक जगवणाऱ्या कलाकारांचं कौतुक करायला तुम्ही नक्की याल” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.