शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण?, करतो ‘हे’ काम, बड्या सेलिब्रिटींशी खास नातं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
who is the nupur shikhare know about son in law aamir khan see the details

आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण?, करतो 'हे' काम, बड्या सेलिब्रिटींशी खास नातं अन्…

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान हिचा आज बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईमध्ये ताज एण्ड्स लँड या अलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. आयरा व नुपूर हे २०२०पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या व नुपूरच्या नात्याविषयी नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. अशातच आता आमिर खानचा होणारा हा जावई नेमका कोण आहे आणि तो काय करतो. याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Nupur Shikhare On Instagram)

नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. नुपूरने अभिनेत्री सुष्मिता सेनलाही फिटनेसचं प्रशिक्षणही दिलं आहे. सुष्मिताने नुपूरकडून दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. केवळ सुष्मिता सेनच नाही तर नुपूर हा आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईत आर.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_popeye)

आणखी वाचा – डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव

नूपुर हा उत्तम फिटनेस प्रशिक्षक असण्याबरोबरच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. तसेच तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. २०१४ मध्ये त्याने आयर्नमॅन ७०.३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन २ या स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. तसेच त्याने इतर काही स्पर्धांमध्येही भाग घेतल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा – आठ वर्षांनंतर सुरुची अडारकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये नागिणीच्या भूमिकेत दिसणार, प्रोमो समोर

२०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि  या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता आणि अखेर आयरा-नूपुर हे दोघे आज एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.   

Tags: bollywoodbollywood newsentertainment newsfitnessira khannupur shikhareWho is Nupur Shikhare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
mrunmayee Deshpande gautami deshpande

“दोन वेगळ्या कंपनीचे सेम प्रॉडक्ट अन्...”, स्वतःच्या पतीचा गौतमीच्या नवऱ्यासह फोटो पोस्ट करत मृण्मयीची गंमतीशीर कमेंट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.