‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकर व ‘काव्यांजली’ फेम अभिनेता पियुष रानडे हे गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्या लग्नाविषयी साऱ्यांना माहिती झाली. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करतच त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून साऱ्यांनाच धक्का बसला होता. लग्नामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सुरुची अडारकार आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Suruchi Adarkar New Serial)
सुरुची ही लवकरच झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘का रे दुरावा’ मालिकेत सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूपच गाजली होती. त्यानंतर आता सुरुची पुन्हा त्याच वाहिनीवर पुनरागमन करत आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ती नगिनीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या या नवीन भूमिकेविषयी पोस्ट केली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे पोस्टर शेअर करत तिने याविषयीची माहिती दिली आहे.
सुरुची जवळपास आठ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत असल्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ती नागिनीच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे एक नवीन भूमिका घेऊन ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या खास भूमिकेसाठी तिचा वेगळा लुकही करण्यात आला आहे. त्यामुळे तिचे चाहते या नवीन मालिकेसाठी व तिच्या या नवीन भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच याचा एक नवीन प्रोमोदेखील शेअर करण्यात आला असून यात सुरुचीची झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – डोक्यावर फेटा, एकमेकांना घास भरवला अन्…; लग्नापूर्वी आमिर खानच्या लेकीचं केळवण, पुरणपोळी-मोदकावर मारला ताव
दरम्यान, आता लग्नानंतर सुरुची-पियुष आपापल्या कामात व्यस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पियुषने लग्नानिमित्ताने ‘काव्यांजली’ या मालिकेतून ब्रेक घेतला होता, पण तो आता पुन्हा एकदा या मालिकेत दिसणार आहे. तर सुरुचीही तिच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की.