शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “त्यांचं नातं खराब…”, अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यावर उषा नाडकर्णींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, “अधिक समस्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "त्यांचं नातं खराब…", अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यावर उषा नाडकर्णींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, "अधिक समस्या…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसा हा शो अधिक रंजक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ मध्ये सध्या फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन विशेष चर्चेत आले. अंकिता लोखंडेने पती विकीसह ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात आल्यापासून या जोडप्यामध्ये वाद सुरु झालेले पाहायला मिळाले. दरम्यान कालांतराने हा वाद इतका वाढला की त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील यावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.

सध्या ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला कार्यक्रमात येत आहेत. सर्वच पालक आपल्या मुलांना खेळ व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप काही समजावून सांगत आहेत, मात्र विकी जैनची आई यांनी तिच्या सुनेला न समजावता तिला चार गोष्टी ऐकवताना दिसल्या. यानंतर घराबाहेर आल्यानंतरही रंजना जैन या आपल्या सुनेबद्दल खूप काही बोलल्या. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या सासूवर नाराजी दर्शविली.

आणखी वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”

या सगळ्यामध्ये अंकिताची ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अंकिता लोखंडेने लोकप्रिय अशा ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या मालिकेमध्ये उषा नाडकर्णी यांनी अंकिताच्या सासूची भूमिका साकारली होती. आता अंकिता व विकीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मीडियामध्ये अनेक प्रश्नोत्तरे केली जात आहेत हे पाहता उषा नाडकर्णी यांनी इंस्टाग्रामवर अंकिताच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत,”अंकिता-विकीच लग्न काही मीडिया मसाला वा सार्वजनिक समस्या नाही. कोणत्याही प्रकारची टिप्पणी करुन त्यांचं हे नातं खराब करु नका. कारण त्याने अधिक समस्या उद्भवू शकतात”.

आणखी वाचा – “तारीख काय ठरली”, रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “पळून लग्न…”

दरम्यान, रिद्धी डोगरा हिने अंकिता लोखंडे जिंकण्यासाठी प्रार्थना केली. तसेच तिने ट्विटद्वारे विकी जैनवर टीकाही केलेली पाहायला मिळाली. फलक नाजने अंकिता लोखंडेच्या सासूबाईंच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यात लिहिले होते की, “अजूनही आंटी, तुम्ही व तुमचा राजा मुलगा तिचा अपमान करण्यास मागे हटत नाही. व्वा आंटी. मी अंकिताला सपोर्ट करत नाही, पण मी या गोष्टीलाही सपोर्ट करत नाही. हे न पचण्यासारखे आहे” असं म्हटलं.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17pavitra rishta
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"सासूबाई शांत राहा आणि…", अंकिता लोखंडेच्या सासूची वागणूक पाहून भडकली राखी सावंत, चांगलंच सुनावलं, म्हणाली, "कैकेयी नका होऊ कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.