एखाद ट्रेंडिंग गाणं असलं की सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही त्यावर ठेका धरण्याचा मोह आवरत नाही. कलाकारही या गाण्यावर थिरकत मंत्रमुग्ध होऊन जातात. अशातच हल्ली बहरला मधुमास या गाण्याची क्रेझ वाढलेली पाहायला मिळतेय. असाच या गाण्याचा मोह अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अवनी तायवाडेला आवरला नाही आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर या गाण्याची एक रील शेअर केली आहे. या रीलवर उर्मिलाने स्वराजच्या आयुष्यात आली मंजुळा असं कॅप्शन दिल आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत उर्मिला कोठारे आणि अवनी तायवाडे एकत्र झळकताना पाहायला मिळतायत. उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अवनी सोबतची बहरला मधुमास यावरची रील शेअर केली आहे.(Urmila Kothare Reel)
तुझेच मी गीत गात आहे मालिकेत उर्मिला कोठारेने तब्बल १० वर्षांनी कमबॅक केलं होत मात्र मालिकेच्या कथेच्या गरजेनुसार अल्पावधीतच तिने एक्सिट घेतली. मात्र आता पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेतून तिने मालिकेत कमबॅक केलंय. आता ती मालिकेत मंजुळा सातारकर ही भूमिका साकारतेय. या मालिकेतील बालकलाकार अवनी म्हणजेच स्वराजच्या आईच्या भूमिकेत आपल्याला उर्मिला पाहायला मिळाली होती.
पहा उर्मिला आणि अवनीचा नवा रील (Urmila Kothare Reel)
यांचं ऑनस्क्रीन बॉण्डिंग तर आपण पाहिलच आता याच कलाकारांचं ऑफ स्क्रीन बॉंडिंगही या रील वरून पाहायला मिळतंय. या मायलेकींनी बहरला मधुमास या गाण्यावर ही रील केली आहे. उर्मिलाला नृत्याची आवड आहेच हे आपण जाणतोच. नृत्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावरून नेहमीच शेअर करत असते. उर्मिला आणि अवनीच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनीही लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.(Urmila Kothare Reel)
हे देखील वाचा – नम्रता संभेरावला लागलं ऑस्करचं वेड
उर्मिला सोबत तिची लेक जिजा हिलाही नृत्याची आवड आहे. जिजासोबतचे अनेक मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ ती नेहमीच इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. उर्मिलाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओला चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात.