rakhi sawant desinger dress : ‘बिग बॉस मराठी सिझन ६ आता अंतिम पर्वात सुरु आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या पर्वाचा फिनाले वीक जवळ आला आहे. हा आता शेवटचा आठवडा सुरु आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चा विजेता कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. राकेश बापट, विशाल कोटियन, दीपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने हे स्पर्धक फिनाले मध्ये आहेत. आणि टॉप ५ म्हणून राहिले आहेत. इतकंच नाहीतर ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतने मात्र रसिकांच्या मनं जिंकली. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून झालेल्या राखीच्या एन्ट्रीने साऱ्यांना वेड केलं. मात्र, १३ व्या आठवड्यातच राखीची ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट झाली. शोमधून बाहेर पडताच राखीचे चाहते नाराज झाले. असं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी प्रेक्षकांच्या नेहमीच संपर्कात राहते.
अशातच आता ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनचा फिनाले जवळ आला आहे. घरातून बाहेर पडलेले स्पर्धक आता फिनालेसाठी तयारी करताना दिसत आहेत. इतकंच नाहीतर ते टॉप ५ स्पर्धकांना सपोर्टही करताना दिसत आहेत. राखी सावंत सोशल मीडियावर राकेश बापटला सपोर्ट करण्याचे, तसेच तन्वी आणि विशालला वोट करण्याचे आवाहन करताना दिसली. ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच राखी थेट दुबईला गेली. दुबईला राखीच स्वतःच घर आहे. अशातच राखी दुबईला गेली होती, तेव्हा तिने ‘बिग बॉस’च्या फिनालेसाठी शॉपिंग केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राखी यामध्ये सांगते, “मी आता दुबईमधल्या एका सगळ्यात भारी दुकानात आता आले आहे. इथे सगळे ड्रेस ८ ते १० लाखांचे आहेत. म्हणजे एका ड्रेसची किमत १० लाखांपर्यंत आहे. यातलाच एक ड्रेस आहे जो १० लाखांचा आहे आणि तोच ड्रेस मी ‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेला घालणार आहे. असे मी १०-१२ लाखांचे चार-पाच ड्रेस खरेदी केले आहेत.”
आणखी वाचा – आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”
राखीच्या ड्रेसची किमत ऐकून नेटकरी मात्र थक्क झाले आहेत. यावरून ती ग्रँड फिनालेसाठी किती उत्सुक आहे हे सुद्धा प्रेक्षकांना समजलंय. राखीने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तिने एकूण ४-५ ड्रेस खरेदी केले आहेत. आता यापैकी राखी फिनालेला कोणता ड्रेस घालणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.





