बऱ्याच मालिका या फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. मात्र कथेनुसार येणाऱ्या ट्विस्टमुळे या मालिकानावर प्रेक्षकही रोष ठेवून असतात. असंच काहीस घडलंय नवा गडी नवं राज्य या मालिकेबाबत. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतेय यांत वादच नाही. मात्र मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे या मालिकेवर प्रेक्षकांची नाराजगी पाहायला मिळतेय. (Nava Gadi Nav Rajya)
आनंदी आणि राघव यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे मालिकेने वेगळाच टर्न घेतला आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता कश्यप परुळेकर या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पल्लवी आणि कश्यपने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हीडोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय.
पहा का चिडलेत राघव आनंदीवर प्रेक्षक (Nava Gadi Nav Rajya)
मालिकेच्या शुटिंगनिमित्त हे कलाकार कोकणात शूटिंगसाठी गेल्याच पाहायला मिळतंय. पल्लवीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. आनंदी राघव VS पल्लवी कश्यप असं कॅप्शन देत पल्लवीने ही ट्रान्सन्फर्मेशनची रील शेअर केलीय. रील आणि रिअल लाईफमध्ये असलेलं त्यांचं बॉण्ड या रिलमध्ये पाहायला मिळतंय. त्यांच्या या रिलवरील कामनेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. आम्हाला रडवून तुम्ही इथे ऐश करताय तर.. वाह रे वाह अशी कमेंट करत नेटकऱ्याने त्यांच्यावरील राग व्यक्त केलाय. तर बऱ्याच नेटकऱ्यानी पुन्हा एकत्र या असं सांगितलंय.(Nava Gadi Nav Rajya)
हे देखील वाचा – बहरला मधुमास या गाण्याची स्वराज आणि मंजुळाला भुरळ
मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे मालिकेवर प्रेक्षकांची नाराजगी ही कळतेय. आनंदी घर सोडून गावी गेलेली असते मात्र राघव तिला मुंबईला घेऊन येत नाही. त्यांनतर आता मालिकेत असे पाहायला मिळतंय की, आनंदी स्वतःच मुंबईला आलेली असते मात्र ती घरी जात नाही. आता आनंदी स्वतः घरी जाणार का हे पाहून मालिकेत रंजक ठरतंय. आनंदी आणि राघवला एकत्र पाह्यला चाहतेही उत्सुक आहेत आता आनंदी आणि राघव एकत्र येणार का हे पाहून मालिकेत रंजक ठरेल.