नम्रता संभेरावला लागलं ऑस्करचं वेड

Namrata Sambherao
Namrata Sambherao

अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची आवडती झाली आहे. तिच्या अभिनयाच्या सह्जतेमुळे , विनोदाच्या टाईमिंगमुळे नक्कीच तिने प्रेक्षकांच्या मनात तिचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. हास्यजत्रा या कार्यमामुळे जरी आता ती चर्चेत असली तरी त्या आधीच कॉमेडी एक्सप्रेस या शो मधून तिने तिच्या विनोदी अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या हास्यजत्रेतील लॉली म्हणून तर तिची एक वेगळी ओळखच निर्माण झाली आहे.या व्यतिरिक्त.सध्या वाळवी चित्रपटातील नम्रताची भूमिका विशेष गाजली. (Namrata Sambherao)

असे जरी असलं तरी स्त्री कलाकार म्हणून काम करताना काही वेगळ्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. लग्न, मुलं, कुटुंब या गोष्टींचा करिअर वर परिणाम होतो. काही वेळेला काही काळासाठी काम थांबवावं लागत. त्या नंतर पुन्हा त्याच जोमाने कम बॅक करणं महत्वाचं असत. लहान मुलं पदराशी असताना शूटच शेड्युल सांभाळणं आई म्हणून कठीण जात असत. परंतु कामावरही तितकाच प्रेम असल्यामुळे ही तारेवरची कसरत करत अवीरथपणे काम सुरूच असत.

पहा काय आहे नम्रताच स्वप्न ? (Namrata Sambherao)

कलाकार म्हणून काम करत असताना काही स्वप्न हा प्रत्येक कलाकार उराशी बाळगून असतो.ऑस्कर हा बहुप्रतिष्टित पुरस्कार या क्षेत्रात मिळवणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असते.असाच एक फोटो नम्रताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून इथे ऑस्कर सोहळा पार पडतो लवकरच इथे पाय रोवायचेत, स्वप्न. असं कॅप्शन देत शेअर केला आहे.अमेरिकेतील डॉलबी थिएटरच्या बाहेरील हा फोटो आहे. त्या जागेवर ऑस्कर सोहळा पार पडतो म्हणून ती जागा नम्रताला खास वाटते. तिच्या या फोटोला प्रक्षकांन सोबत कलाकारांनी देखील पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री अश्विनी कासार, शिवाली परब आणि अभिनेता सुयश टिळक यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स देखील केलेल्या पहायला मिळत आहेत. कुर्रर्रर्र नाटकाच्या अमेरिका दौऱ्या निमित्त हे कलाकार सध्या अमेरिकेत आहेत.आणि अमेरिकेतल्या अनेक गमंती कुर्रर्रर्र नाटकाचे कलाकार आपल्या सोशल मीडियावरून वेळोवेळी शेअर करत आहेत. (Namrata Sambherao)

हे देखील वाचा : लेकापासून दूर जाताना नम्रता भावुक… लेकासाठी लिहिली खास पोस्ट

चित्रपट, नाटक, कॉमेडी शो सगळं एकावेळी मॅनेज करत प्रत्येक भूमिका तितक्याच उत्सहाने पार पाडणे हे कौतुकास्पद आहे.तरीही नम्रताच्या चेहऱ्यावर सतत एक हसू असत. खूप प्रसन्न आणि हसतमुख असं तिचं व्यक्तिमत्तव आहे. आणि तिचा हाच स्वभाव तिच्या भूमिकांमध्ये देखील उतरतो आणि म्हणूनच तिने साकारलेल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Prajakta Mali Bold Photoshoot
Read More

प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मराठी सिने सृष्टीमध्ये प्राजक्ता माळी हिने…
Genelia post for Rahyl
Read More

‘तुला आता चालण्यासाठी माझी गरज नाही’…लेकाच्या वाढदिवसनिमित्त जिनिलीयाचा खास सल्ला

सिनेसृष्टीमधील लाडक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख अवघ्या महाराष्ट्राने दादा-वहिनी म्हणून या जोडप्याला त्यांच्या मनात महत्वाचं…
Celebrity Couple Age
Read More

वयात जास्त अंतर असूनही हे सेलिब्रिटी कपल करतायत सुखाचा संसार

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल बद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. बरं या कलाकारांच्या वयात मोठं अंतर असूनही…
Siddharth Mitali Vacation Mode
Read More

सिद्धार्थ-मितालीची Disneyland ट्रीप

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत असणार क्युट कपल म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली…
Kiran Mane controversy
Read More

त्यांनी’विलास पाटील’सारख्या व्यक्तिरेखेचा खून केला होता-किरण मानेच्या पोस्टने चर्चेला उधाण

अनेक मालिका, चित्रपटांतून आणि त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वातून अभिनेता किरण माने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जाळं आणि धूर संगटच…
Radha Sagar Goodnews
Read More

वाढदिवसाचं औचित्य साधत राधा सागरने दिली गुडन्यूज

छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणारी अभिनेत्री म्हणजे राधा सागर. आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता आणि…