गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत विविध धाटणीचे अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातही ‘बाईपण भारी देवा’ सारख्या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्डस् तोडत संपूर्ण भारतीय चित्रपटजगताला याची दखल घ्यावी लागली. आता लवकरच एक वेगळा विषय घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘तीन अडकून सीताराम’. (Teen Adkun Sitaram Trailer)
प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक हृषिकेश जोशी ‘तीन अडकून सीताराम’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी व अन्य कलाकार दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर व पोस्टर्स प्रदर्शित झाले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा समोर आला आहे.
हे देखील वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष
तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना एक आगळीवेगळी कॉमेडी, ट्विस्ट व रोमान्स पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये वैभव, आलोक आणि संकर्षण हे तिघे मित्र लंडनमधील एका पबमध्ये गेलेले असतात. तिथे दारूच्या नशेत ते असं काही करतात, की ज्यामुळे पोलिस त्या तिघांना अटक करतात. पण, त्यांनी केलेल्या कृत्याचे त्यांना अजिबात जाणीव नसते. चित्रपटात प्राजक्ता माळीची भूमिका समोर आली असून ती या तिघांना सोडवण्यासाठी धडपड करत असते. या तीन मित्रांनी नक्की तिथे काय केलंय? ते जेलमधून सुटणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
हे देखील वाचा – “हिंदी चित्रपटांतील नायकांपेक्षा…”, अशोक मामांसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, “ते भेटतात तेव्हा…”
दरम्यान, काल या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. ज्यामध्ये चित्रपटातील कलाकार वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, आनंद इंगळे, दिग्दर्शक हृषीकेश जोशी व अन्य कलाकार उपस्थित होते. चित्रपटाची निर्मिती लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व नितीन वैद्य यांनी केली आहे. तर याचे लेखन – दिग्दर्शन हृषीकेश जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.