मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2026 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
krishnai chya leki serial

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

krishnai chya leki serial : ‘झी मराठी’ च्या नव्याने दाखल होणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या निमित्ताने कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात, संगममाऊली येथे विशेष पत्रकार परिषद आणि प्रेक्षक भेटीचे आयोजन करण्यात आले. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेला हा घाट मनमोहक वातावरणासाठी ओळखला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, नदीचे शांत पात्र आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही एका आई आणि तिच्या तीन मुलींची हृदयस्पर्शी कथा आहे. कुटुंब, नाती, संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ यांची गोष्ट सांगणारी ही मालिका कोल्हापूरच्या कृष्णाईच्या मातीत चित्रित झाली आहे. त्यामुळे या मालिकेच्या शुभारंभासाठी संगममाऊली सारख दुसरं स्थान नाही. जस नद्यांचा संगम एकतेचा संदेश देतो तसेच मालिकेतील ‘कृष्णाई’ आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते.

कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी कृष्णा नदीची आरती करून झाली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. आतापर्यंत फक्त प्रोमोमध्ये आणि टीव्ही वर पाहिलेले कलाकार प्रत्यक्ष भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी कलाकारांसोबत फोटो काढले आणि संवाद साधला. यानंतर मालिकेतील कलाकार एकता लब्दे (शारदा), ट्विंकल यादव (गौरी), नारायणी वर्ने (सौदामिनी), रोहित परशुराम (शंकर) आणि स्मिता सरवदे (सत्यभामा ) यांनी आपल्या व्यक्तिरेखांविषयी चर्चा केली. मालिकेत कृष्णाईची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांनी कथेचा गाभा, व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये आणि प्रेक्षकांना या कथेशी कसे सहज नाते जोडता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले.

आणखी वाचा – ‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांनी सर्व उपस्थितांना मिठाईच्या खास डब्बे वाटप केले. खानावळ चालवणारी कृष्णाई जशी गोडधोडाशिवाय कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करत नाही, त्याचप्रमाणे आपल्या प्रेक्षकांसोबतच्या या नव्या प्रवासाची सुरुवातही गोड आठवणींनी करण्यात आली. कलाकारांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं, “संगममाऊली घाटावर झालेला ही प्रेस मीट आमच्यासाठी खूप खास होती. मालिकेच्या सुरुवातीचे अनेक महत्त्वाचे प्रसंग आम्ही याच परिसरात चित्रित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणं म्हणजे अनेक सुंदर आठवणींना उजाळा देण्यासारखं होतं.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

कृष्णा नदीचा शांत प्रवाह, निसर्गरम्य वातावरण आणि गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम यामुळे हा अनुभव आणखी संस्मरणीय झाला. प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. मालिकेला मिळणारं हे प्रेम पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो असून, ‘कृष्णाईच्या लेकी’ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल याची खात्री वाटते.”

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
Kap Bashi Trailer

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, 'कप बशी' चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.