शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ मालिकेतील भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून अभिनेत्रीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2023 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shilpa Navalkar Share Bts Video

'ठरलं तर मग' मालिकेतील भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून अभिनेत्रीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”

दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातही झालेली पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. सोशल मीडियावर तर अजूनही चित्रपटातील गाणी, डायलॉग्सचे अनेक रील्स व्हायरल होताना दिसत आहेत. चित्रपटातील कलाकारांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्री शिल्पा नवलकर विशेष चर्चेत आली. सोशल मीडियावरही शिल्पा यांचा बराच वावर असलेला पाहायला मिळतो. (Shilpa Navalkar Share Bts Video)

अशातच बाईपण भारी चित्रपटानंतर त्या छोट्या पडद्यावर दिसल्या. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांची आवडत्या मालिकांच्या यादीत आहे. अशातच या मालिकेत आपल्याला अभिनेत्री शिल्पा नवलकरची एंट्री पाहायला मिळाली. शिल्पा नवलकर यांनी या मालिकेत प्रतिमा ही भूमिका साकारली आहे.

आणखी वाचा – “पाटील म्हणतो नाव घे बाई…”, भर कार्यक्रमात नम्रता संभेरावचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, “योगेशराव बसले पुजेला आणि…”

शिल्पा यांनी या भूमिकेसाठीचा खास मेकअपचा पडद्यामागचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रतिमाचा अपघात झालेला आणि भाजलेला लूक दाखवण्यासाठी अभिनेत्रीला खास प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला होता. दरम्यान मेकअप करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पा नवलकर लिहितात, “काही क्षणांसाठी दिसणाऱ्या भाजल्याच्या खुणा दाखवण्यास मागे असणारी मेहनत!! ‘ठरलं तर मग’ मालिका स्टार प्रवाहवर पाहात राहा.”

View this post on Instagram

A post shared by Shilpa Navalkar (@shilpanavalkarofficial)

शिल्पा नवलकर यांनी शेअर केलेला हा BTS व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “बापरे! तुला खरंच सलाम आहे”. तर एका युजरने, “खूप मेहनत आणि जोखमीचं काम आहे तुम्हाला अनेक शुभेच्छा” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर आणखी एका चाहत्याने “उत्तम कलाकर कसा असावा तुमच्या कडून शिकावे मॅडम, कलाकृती उत्तम कशी करता येईल त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न आणि त्याच बरोबर मेकअप आर्टिस्ट चे पण कौतुक की इतकी मेहनत घेऊन कलाकारचे व्यक्तिरेखे अनुरुप रुप पालटता” अशी कमेंट करत शिल्पाच कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘ठरलं तर मग’मध्ये सध्या किल्लेदार प्रतिमाचा शोध घेत आहेत. त्यांच्यासमोर प्रतिमा येणार का? सायली आणि प्रतिमाची भेट होणार का? हे आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Tags: entertainmentshilpa navalkarstar pravahtharal tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
aamir khan daughter ira khan

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची तारीख व ठिकाण ठरलं, होणाऱ्या मराठमोळ्या जावयासाठी अभिनेत्याची जय्यत तयारी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.