शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंदी चित्रपटांतील नायकांपेक्षा…”, अशोक मामांसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, “ते भेटतात तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 14, 2023 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Saleel Kulkarni shared a special post

Saleel Kulkarni shared a special post

‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाने कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रमातील ही लहान मुलं अवघड गाणी अगदी सहजपणे गातात यामुळे गाण्यातील दिग्गजांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांचं कौतुक करत आहे. या कार्यक्रमाने सगळ्या प्रेक्षकांना भूरळ पाडली. सध्या या कार्यक्रमात विविध पाहुणे मंडळी हजेरी लावत आहेत. नुकतेच या कार्यक्रमात एका खास पाहुण्याचे आगमन झाले होते. मराठी सिनेसृष्टीत ज्यांना मामा म्हणून ओळखले जाते ते आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक सराफ.  (Saleel Kulkarni shared a special post)

अशोक मामांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. त्यांनी आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. नुकतेच अशोक मामा ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात पाहुणे म्हणून  आले होते. त्यावेळी कार्यक्रमातील छोट्या स्पर्धकांनी त्यांचे पाय धुऊन गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत होता. नुकतीच अशोक मामांची आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. ती म्हणजे गायक सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेला त्यांच्याबरोबरचा फोटो.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

अशोक मामांसोबतचे फोटो शेअर करत सलील यांनी त्यांच्यासाठी अशोक मामा काय आहेत हे सांगितलं. फोटो शेअर करत ते म्हणतात, ‘अशोक सराफ सर… हे नाव पहिल्यांदा कधी ऐकलं हे आठवायला लागलो की मला जुने दिवस आठवतात. मी शाळेत असताना माझ्या आईने आम्हाला सायकलवरून विजय टॉकीजला ‘गोंधळात गोंधळ’ हा चित्रपट बघायला नेलं होतं. त्यावेळी आम्हाला दोन चार महिन्यातून एखादा चित्रपट बघायला मिळायचा. तेव्हा आधीच्या जाहिराती सुद्धा डोळे भरून बघण्यात वेगळाच आनंद मिळायचा. त्यात जी गंमत होती ती आता एकाच वेळी नेटफ्लिक्सवर पिक्चर, हॉटस्टारवर मॅच व प्राईमवर फ्रेंड्स बघणाऱ्यांना कळणार नाही. ‘एक डाव भूताचा’ चित्रपटातील अशोक सराफ तर मला इतके आवडले की नंतर बरेच दिवस मी ‘बरुं’ असा आवाज काढून ‘मास्तुरे..’असं म्हणायचो. त्या चित्रपटानंतर डेक्कनवर खाल्लेला साधा डोसा आठवतो. साधा डोसा व अर्ध अर्ध गोल्ड स्पॉट हा मी व माझी बहीण खाल्लेला. तर आईने नेहमीप्रमाणे सगळं त्यागून फक्त खाल्लेली इटली’.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

पुढे ते म्हणतात, ‘त्या काळात अभिनेता लक्ष्मिकांत बेर्डे व अभिनेता अशोक सराफ यांनी बरीच धुमाकूळ घातली होती. ‘धुमधडाका’ चित्रपटातील ‘वाख्या वुक्खहू’वाले अशोक मामा तर ‘बनवाबनवी’ चित्रपटातील ‘हा माझी बायको’पासून ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ आणि ‘लिंबू कलरच्या साडी’पासून ते ‘कुणीतरी येणार येणार गं’पर्यंत सगळं काही आमचं तोंडपाठ झालं. त्यांच्या मला आवडणाऱ्या भूमिका म्हणजे ‘कळत नकळत’ चित्रपटातील ‘मामा’ व ‘चौकट राजा’ चित्रपटातील ‘गणा’ ह्या भूमिका त्यांनी खूप गाजवल्या. त्यांनी हिंदी चित्रपटातील सर्व नायकांपेक्षा अगदी सहज भूमिका साकारल्यात. या महानायकासह माझं नाव पहिल्यांदा पडद्यावर बघताना झालेला आनंद मला आजही आठवतो. ‘एक उनाड दिवस’ चित्रपटात ‘हूरहूर असते तीच उरी’ ऐकणारे अशोक सराफ व ‘निशाणी डावा अंगठा’ मधील मुख्याध्यापक अशा चित्रपटात मला गाणी गाता आली हे माझं खूप मोठं भाग्य आहे. अलीकडच्या काळात ‘श्रावणमाशी’ किंवा ‘आनंदाने वेडेपिशे होणे’ म्हणत आपल्याला वेड लावणारे ‘एक डाव धोबीपछाड’ चित्रपटातील अशोक मामा अजूनही ‘पांडू हवालदार’ या भूमिकेतील एनर्जी घेऊन वावरतात. ते भेटतात तेव्हा खूप शांत, प्रांजळ, मिश्किल पण मोजकंच बोलतात. ‘झी’ने जीवनगौरव साजरा करताना अभिनेता सिद्धार्ध जाधव याने केलेला इतका अप्रतिम परफॉर्मन्स पाहता अशोक मामांना अगदी गदगदलेलं पाहिलं. या आठवड्यात आमच्या ‘सारेगमप’मध्ये ते आले होते. शूटिंगमध्ये त्यांना भेटून ‘एकादा काय झालं’साठी अभिनंदन केलं. त्या क्षणी मी त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भेटलात की मला माझं लहानपण भेटतं. शाळा, कॉलेज, साधा डोसा, आईची सायकल असं सगळ काही पुन्हा नव्याने भेटतं. मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याल प्रत्यक्ष भेटतो, ही गणपती बाप्पाचीच कृपा’, असं म्हणत सलील यांनी अशोक मामांच्या आठवणींना उजाळा दिला.

View this post on Instagram

A post shared by मराठी मनोरंजन विश्व (@marathimanoranjanvishwa)

या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने तर ‘तुमचं लिखाण म्हणजे आमच्यासाठी संवाद’ असं म्हणत सलील यांच्या लिखाणाचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘किती छान आठवणी’ असं म्हणत त्यांच्या आठवणींचं कौतुक केलं.

Tags: ashok sarafevergreen actormarathi singerpost viralsaleel kulkarnishared a special post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Akshaya Naik Entry On Theater

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.