मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2023 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshaya Naik Entry On Theater

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष

छोटा पडदा गाजवल्यानंतर कलाकार मंडळी बरेचदा मोठ्या पडद्याकडे पाऊल टाकताना दिसतात. तर काही कलाकार मंडळी रंगभूमीवर आपली कला दाखवतात. रंगभूमीवर काम करण्याची आवड जोपासतात. यांत उदाहरण द्यायचं झाल्यास ओंकार भोजने, विशाखा सुभेदार ही नाव घेता येतील. आता त्यांच्या पाठोपाठ मराठमोळी व सर्व प्रेक्षक वर्गाची लाडकी सुंदरा आता मालिकाविश्वानंतर रंगभूमी कडे वळली आहे. (Akshaya Naik Entry On Theater)

अभिनेत्री अक्षया नाईक हिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती नाटकात मुख्य भूमिका साकरणार असल्याचं समोर आलं आहे . या नव्या कोऱ्या नाटकाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. असं असलं तरी अद्याप या नाटकाचं नाव मात्र गुपित ठेवण्यात आलं आहे. लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती ‘भूमिका थिएटर्स’ व ‘वाईड अँगल एन्टरटेन्मेंट’ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. या नाटकातील अक्षयाचा नवा लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून यांत अक्षयाचा मराठमोळा लूक पाहायला मिळतोय.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – दुबईमध्ये मजा-मस्ती करत आहेत सिद्धार्थ-मिताली, बायकोचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणतो, “मी मोठी झाली म्हणते आणि…”

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाचं खूप कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. मात्र हलकेफुलके असलेले हे नाटक आजही तितकेच ताजेतवाने आहे. नाटकाचे संगीतकार सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच आहे.

आणखी वाचा – “म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “मानगुटीवर बसून…”

अक्षया नाईकने आजवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका साकारून तिने तिच्यातील अभिनयाची क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल तिला विचारले असता तिने अजुन थोड़ी प्रतीक्षा करावी, असे सांगितले. अक्षयाबरोबर या नाटकात आणखी कोण कलाकार आहेत, हे मात्र अजुन गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Tags: akshaya naikentertainmentsundara manamadhye bharli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Namrata Sambherao Special Ukhana

"पाटील म्हणतो नाव घे बाई…", भर कार्यक्रमात नम्रता संभेरावचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, "योगेशराव बसले पुजेला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.