गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राम चरणच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन; हैदराबादमधील खास नामकरण सोहळा चर्चेत; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 13, 2026 | 4:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ram Charan Welcomed Twins Baby

राम चरणच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन

Ram Charan Welcomed Twins Baby : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातील एका आनंदाच्या बातमीमुळे आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांनी जुळ्या बाळांचं स्वागत केलं आहे. त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आलं आहे. ही आनंदाची बातमी सर्वप्रथम राम चरणचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली.

राम चरण आणि उपासना यांचा विवाह २०१२ साली पार पडला. लग्नानंतर जवळपास अकरा वर्षांनी, २० जून २०२३ रोजी उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवण्यात आलं. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्या आनंदाची भर पडली आहे. दुसऱ्यांदा आई-बाबा झालेल्या या जोडप्याला यावेळी जुळी मुलं एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहेत. हैदराबाद येथील निवासस्थानी आयोजित नामकरण सोहळ्यात राम चरणने आपल्या जुळ्या बाळांची नावं जाहीर केली. मुलाचं नाव ‘शिवराम’ तर मुलीचं नाव ‘अन्वीरा देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. (Ram Charan Welcomed Twins Baby)

आणखी वाचा – राखीने केली ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीची तोडफोड, सागरची केली कानउघडणी, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

या नावांमागील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करताना राम चरणने सांगितलं की, भगवान शिव आणि श्रीराम यांच्या नावांवरून ‘शिवराम’ हे नाव ठेवलं आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील चिरंजीवी यांचं जन्मनाव ‘शिव शंकर वर प्रसाद’ असल्याने त्यालाही या नावात कौटुंबिक संदर्भ आहे. मुलीचं ‘अन्वीरा देवी’ हे नाव अमर्याद धाडस आणि दैवी स्त्रीशक्तीचं प्रतीक असल्याचं राम चरणने स्पष्ट केलं. ही नावं केवळ ओळख नसून शक्ती, प्रेम आणि धैर्याचं प्रतिनिधित्व करतात, असंही त्याने नमूद केलं. दरम्यान, दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर उपासनाने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बाळांच्या जन्माला अवघा आठवडा झाला असून सध्या ती कुटुंबासोबत हा खास क्षण अनुभवत आहे. तिन्ही मुलांना एकत्र पाहताना तिला अतिशय आनंद होत असल्याचं तिने म्हटलं. राम चरण आणि उपासना यांच्या कुटुंबात सध्या आनंदाची लहर असून चाहत्यांकडूनही या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Ram Charan Welcomed Twins Baby)

आणखी वाचा – कॉमेडीचा बादशाह राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? आर्थिक व्यवहार पडला महागात

Tags: bollywood newsentertainmentRam Charan Welcomed Twins Baby
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Thalapathy Vijay rally accident man death

थलपती विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, पत्रकार-कार्यकर्त्यांमध्ये वाद, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.