टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेता म्हणून अर्जुन बिजलानीचे नाव घेतले जाते. अनेक मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तो त्याच्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीने प्रेक्षक त्याला खूप पसंती दर्शवतात. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेतून त्याला अधिक पसंती मिळाली. सध्या तो ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ति’ मध्ये दिसत आहे. पण आता तो आजारी असल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागले असल्याचे वृत्त समोर येत आहे. (Arjun Bijlani in hospital)
अर्जुनने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. तसेच लिहिले आहे की, “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं”. याबद्दल जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “९ एप्रिल रोजी अपेंडिक्सची शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला दुखू लागल्याने ८ मार्चला तो शूटिंगवरही गेला नाही व मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात भरती झाला”.याबरोबर अर्जुनने महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक व्हिडीओही शेअर केला होता.या व्हिडीओमध्ये ते भगवान शंकराची पूजा करताना दिसत आहे. तसेच महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचा सर्वांचा आशिर्वाद मला द्या”.

अर्जुनने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो अनेक मालिका, रिॲलिटी शोच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता तो सूत्रसंचालन करण्यासाठी खूप मोठे शुल्क आकारतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका टीव्ही शोच्या एपिसोडसाठी १.५ लाख रुपये शुल्क आकरतो. त्याचं मुंबईमध्ये १० कोटी रुपयांचे एक आलिशान घर आहे.
याआधी तो ॲक्टर लेफ्ट-राइट, मिले जब हम तुम’, मेरी आशिकी तुमसे ही’, ‘नागिन’, ‘कवच’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘इश्क मे मरजावा’ या मालिकांमध्ये दिसला होता.तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’, ‘रविवार विथ स्टार परिवार’, ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला १४’, ‘डान्स दिवाने २’, ‘किचन चॅम्पियन ५’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे.