कलाकार मंडळींच्या फॅशनची सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कलाकार मंडळींच्या हटके फॅशन पाहणं प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. कपडे, चपला , दागिने अशा विविधांगी फॅशन करत ते चाहत्यांसमोर येत असतात. तर बरेचदा कलाकार मंडळींच्या फॅशनमध्ये अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची नेहमीच चर्चा रंगलेली असते. अभिनेत्रींच्या हटके मंगळसूत्रांच्या डिझाइन चाहते फॉलो करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गळ्यातील हटके मंगळसूत्राच्या डिझाइनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. (Shweta Shinde Mangalsutra Design)
‘अवंतिका’, ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. ही अभिनेत्री अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली. मात्र अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ती अधूनमधून मालिकाविश्वाकडे परतत असते. मराठी सिनेविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. श्वेताने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’ या त्यांच्या मालिका सोशल मीडियावर तुफान गाजल्या. उत्तम कथानकासह त्या नेहमीच नवनवीन मालिका घेऊन येत असतात.
श्वेता कायमच तिच्या लूक व पर्सनॅलिटीमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अशातच अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. खास पारंपरिक टच असलेल्या या श्वेताच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये झुमके असलेले खास डिझाइन परिधान केलं आहे. काळ्या मण्यांमध्ये कमीत कमी सोन्याचा वापर करत तिच्या या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.
श्वेता मूळची साताऱ्याची असून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती मुंबईत आली. मुंबईमध्ये महाविदयालयात शिक्षण घेत असतानाच तिला अनेक मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे, घरच्यांचा संपूर्ण सपोर्ट नसतानाही तिने या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक उत्तोमत्तम मालिका व चित्रपटांमध्ये अतिशय महत्वाच्या भूमिका करत ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली.