शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन बिजलानी रुग्णालयामध्ये भरती, उपचारादरम्यानचा फोटोही केला शेअर, अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 9, 2024 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arjun Bijlani in hospital

अर्जुन बिजलानी रुग्णालयामध्ये भरती, उपचारादरम्यानचा फोटोही केला शेअर, अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय?

टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेता म्हणून अर्जुन बिजलानीचे नाव घेतले जाते. अनेक मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तो त्याच्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीने प्रेक्षक त्याला खूप पसंती दर्शवतात. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेतून त्याला अधिक पसंती मिळाली. सध्या तो ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ति’ मध्ये दिसत आहे. पण आता तो आजारी असल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागले असल्याचे वृत्त समोर येत आहे. (Arjun Bijlani in hospital)

अर्जुनने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. तसेच लिहिले आहे की, “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं”.  याबद्दल जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “९ एप्रिल रोजी अपेंडिक्सची शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला दुखू लागल्याने ८ मार्चला तो शूटिंगवरही गेला नाही व मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात भरती झाला”.याबरोबर अर्जुनने महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक व्हिडीओही शेअर केला होता.या व्हिडीओमध्ये ते भगवान शंकराची पूजा करताना दिसत आहे. तसेच महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचा सर्वांचा आशिर्वाद मला द्या”.

आणखी वाचा – ‘तारे जमीन पर’मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, “१ किमी दात बाहेर असताना…”

अर्जुनने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो अनेक मालिका, रिॲलिटी शोच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता तो सूत्रसंचालन करण्यासाठी खूप मोठे शुल्क आकारतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका टीव्ही शोच्या एपिसोडसाठी १.५ लाख रुपये शुल्क आकरतो. त्याचं मुंबईमध्ये १० कोटी रुपयांचे एक आलिशान घर आहे.

आणखी वाचा – “आमच्या छोट्याशा टीव्हीवर…”, नाटकासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता देशमुख भावुक, म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

याआधी तो ॲक्टर लेफ्ट-राइट, मिले जब हम तुम’, मेरी आशिकी तुमसे ही’, ‘नागिन’, ‘कवच’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘इश्क मे मरजावा’ या मालिकांमध्ये दिसला होता.तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’, ‘रविवार विथ स्टार परिवार’, ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला १४’, ‘डान्स दिवाने २’, ‘किचन चॅम्पियन ५’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे.     

Tags: actingadmit in hospitalanchorArjun bijlaniHindi serialtelevision actorTv actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Shweta Shinde Mangalsutra Design

श्वेता शिंदेच्या मंगळसूत्राची झुमका स्टाइल डिझाइन, काय आहे यामध्ये युनिक?, स्त्रियांची अधिकाधिक पसंती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.