आमिर खानचा २००७ साली आलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये लहान मुलांच्या आयुष्यावर भाष्य केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रसिद्धी दिली. या चित्रपटाचा नायक असलेला ‘ईशान’ हा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ईशानची भूमिका साकरणारा दर्शील सफारी हा रातोरात प्रसिद्ध झाला. नुकताच त्याने आपला 27वा वाढदिवस साजरा केला असून तो आमिर खानबरोबर एका जाहिरातीमध्येही दिसून आला आहे. त्याने आपल्या बालपणीच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत. (Darsheel Safary on Taare Zameen Par)
दर्शीलने २०२२मध्ये एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या बालपणीच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी सांगितल्या आहेत. शाळेत असताना बाहेर आलेल्या दातांमुळे कसा त्रास दिला गेला हे सांगितले. तो म्हणाला की,“माझी ऊंची,माझे दात तसेच माझ्या प्रत्येक गोष्टीवरुन मस्करी केली जात असे. माझे दात १ किलोमीटर बाहेर आले होते. पण जे झालं ते झालं. या दातांमुळेच मला ‘तारे जमीन पर’ चित्रपट मिळाला होता”.
पुढे तो म्हणाला की, “मी लहान असताना खूप संवेदनशील मुलगा होतो. मला प्रत्येक गोष्टीमुळे दु:ख होत असे. जेव्हा तुम्ही अभिनेता बनता तेव्हा तुमच्यातील गोंधळ शांत करणे गरजेचे असते. प्रत्येक प्रसंगाची वास्तविकता पहावी लागते. जर मला कोणी आळशी म्हणत असेल मला यावर काम करायला हवं. पण जर ते म्हणत असतील की दर्शीलला अभिनय आवडत नाही तर हे खोटं आहे”. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे दर्शील आता सकारात्मकतेने पाहतो. तसेच“मला खूप काही शिकायला मिळालं. आता काही झालं तरीही त्याचा काहीही परिणाम माझ्यावर होत नाही. पण जे त्यावेळी घडलं त्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे”, असेही तो म्हणाला.
दर्शील ‘तारे जमीन पर’ व्यतिरक्त ‘बम बम बोले’, ‘जोकोमॅन’, ‘मिडनाईट्स चिल्र्डन’ या चित्रपटामध्येही दिसला होता. तसेच तो एका डॉक्युफिक्शन फर्स्ट ॲक्टमध्येही पाहिलं गेलं. हा ॲक्ट अभिनयक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बाल-कलाकारांच्या वास्तविक जीवनाचे पैलू दाखवण्यात आले होते.