मालिकांच्या पुरस्कार सोहळ्यांची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच थाटात पार पडला. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे तिसरं वर्ष. डोळे दिपावणाऱ्या या रंगारंग सोहळ्यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून सन्मानित करण्यात आले. (star pravah purskar sohla)
पहा कोण ठरलं स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे मानकरी (star pravah purskar sohla)
तर सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार पटकावला ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूने
अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार.
तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार.
रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा ठरली सर्वोत्कृष्ट आई.
तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हारने पटकावला सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार.
चिमुकल्या लक्ष्मी, स्वरा, पिहू, दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार विभागून देण्यात आला.(star pravah purskar sohla)
आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गौरवण्यात आलं.
सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाला विभागून देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस मेल या पुरस्काराचा मानकरी ठरला ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन.
====
====
तर सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील राघव-सिंधू.
प्रवाहचा फटाका हा विशेष पुरस्कार पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीला देण्यात आला.
असे अनेक पुरस्कार या सोहळ्यात देण्यात आले. स्टार प्रवाह वाहिनीची जमेची बाजू म्हणजे ही वाहिनी कलाकार मंडळींसोबत इतर तुमचेही आभार व्यक्त करण्यात पुढे असते. पडद्यामागील कलाकारांची कसरत केलेल्या मंडळींना ही वाहिनी कायम दुय्यम स्थान देते. स्टार प्रवाहकडून कलाकारांसोबतच तंत्रज्ञ मंडळींचाही विशेष सन्मान करण्यात येतो. दिग्दर्शक आणि लेखकांना सन्मानित केल्यानंतर यंदा मालिकांच्या २० छायाचित्रकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अशा या सोहळ्याला कलाकार मंडळींनी नटून थटून चार चाँद लावले.