सध्या मराठी कलाकारांचा लग्नाचा विषय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे अभिनेता प्रथमेश परबचं लग्न नुकतंच अगदी थाटामाटात पार पडलं. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा सावंतच्या संगीत सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. पूजाही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अशामध्ये मराठीमधील आणखी एक जोडपं त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. ते जोडपं म्हणजे तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके. तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. तसेच दोघांचा साखरपुडा सोहळा नुकताच संपन्न झाला. (Titeeksha Tawade And Siddharth Bodke Engagement Ceremony)
तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशामध्येच दोघांच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखं आहे. तर तितीक्षा व सिद्धार्थच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल रंगाच्या साडीमध्ये नव्या नवरीचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. तसेच तितीक्षाच्या हातामधील हिरवा चुडा आकर्षणाचा विषय ठरत आहे. तितीक्षाचा लूक अगदी सुंदर आणि युनिक आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेच्या हातावर रंगली सिद्धार्थ बोडकेच्या नावाची मेहंदी, नवरीबाईचा उत्साह, जय्यत तयारी अन्…
तितीक्षाबरोबरच सिद्धार्थही तिला लूकबाबत टक्कर देत आहे. सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा सदरा व लेहंगा परिधान केला आहे. त्यावर त्याने शाईन जॅकेट घातलं आहे. त्याचा लूकही अगदी पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे तितीक्षाच्या हातामधील चंदेरी व डायमंडने सजलेल्या अंगठीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर कलाकारांनीही कमेंट कर तितीक्षा व सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
तितीक्षा व सिद्धार्थने साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हटलं की, “forever with my bestfriend”. मालिकांमध्ये काम करण्यादरम्यान तितीक्षा व सिद्धार्थमध्ये आधी घट्ट मैत्री निर्माण झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. आता त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे. दोघांनीही कधीची त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्य केलं नाही. तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचे फोटो समोर येताच सगळ्यांना सुखद धक्का बसला. आता तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाचा थाट कसा असणार? हे पाहावं लागेल.