स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. मालिकेतील अर्जुन व सायली या पात्रांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारलं आहे तर अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशालीने साकारलं आहे. आपल्या अभिनयामुळे कायमचं चर्चेत असणारा हा अभिनेता नुकताच त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
अभिनेता अमित भानुशालीने नुकतंच एक नवीन घर खरेदी केलं आहे आणि याचा व्हिडीओ त्याने त्याच्या स्वत:च्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केला आहे. अभिनेत्याने त्याच्या युट्यूब चॅनेलद्वारे एका छोटासा व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांना अभिनेता त्याच्या जुन्या घरातून सामान शिफ्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “नव्या घरात आपलं संपूर्ण सामान शिफ्ट करणे म्हणजे खरंच तारेवरची कसरत होते. घर सांभाळणे, शूटिंग सांभाळणे, नवीन वस्तु घेणे, घेतलेले नवीन सामान घरात शिफ्ट करणे म्हणजे खूप मोठा टास्क असतो. तर मी हे सगळं कसं केलं? मी कुठे राहायला जात आहे?, माझ नवीन घर कसं आहे? ते या नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे”.
यापुढे व्हिडीओमध्ये अमितने त्याच्या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्याचबरोबर शिफ्टींग करतांना त्याने केलेली मदत ही पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी त्याने असं म्हटलं आहे की, “नवीन घरात सामान शिफ्ट करून खूपच धावपळ होते. पण, हा सगळा ताण असताना माझ्या लेकाचं म्हणजेच हृदानचं एक हास्य पाहून मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन उर्जा निर्माण होते”.
दरम्यान, या व्हिडओखाली कमेंट्समध्ये अमितच्या चाहत्यांनी त्याच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्या चाहत्यांमध्ये त्याचं नवीन घर पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या त्याचे सगळे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.