छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो संपून आता जवळपास एक आठवडा पूर्णं झाला आहे, तरीदेखील या शोची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. बिग बॉसच्या घरात असताना प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. पण आता हा शो संपला असला तरी या शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत आहेत.
‘बिग बॉस’च्या शोमध्ये मुनव्वर व मनारा यांच्या नात्यात अनेक चढ-उतार होते. दोघांमध्ये कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळाले. नुकतंच मुनव्वरने मनाराला कीस केल्याचे प्रकरण गाजले होते. यात मनाराने विकीला आपली जाहीर माफी मागण्यासाठीदेखील म्हटले होते. अशातच आता मूनव्वरने मनाराची खिल्ली उडवली आहे.
#MunawarFaruqui roasts #MannaraChopra ????pic.twitter.com/6OH1zkE9g7
— The Khabri (@TheKhabriTweets) February 3, 2024
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
‘बिग बॉस १७’ संपल्यानंतर मनाराने स्वत:ला महिला श्रेणीतील विजेती म्हटले होते. तिने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आणि आता यावरून मुनव्वरनेही तिची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मनाराची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – असं आहे मुग्धा वैशंपायनच्या सासरकडचं घर, नवऱ्यासह कोकणात रमली गायिका, फोटो व्हायरल
मुनव्वरने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत एक व्हिडीओ केला. यात त्याने असे म्हटले की, “एनआरआय गटात औरा हा विजेता असून नवीद सोल उपविजेता ठरला आहे. पत्नी श्रेणीत अंकिता लोखंडे विजेती तर विकी जैन हा पती श्रेणीत विजेता आहे.” यावरून त्याने मनाराचे नाव न घेत तिला अप्रत्यक्षपणे टोमणा मारला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.