मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्य खरंच पडला आहे का पारूच्या प्रेमात?, दामिनीचा संशय ठरणार का खरा?, तर लोगोसाठी कोणाच्या डोळ्यांची होणार निवड?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 2, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

आहे का पारूच्या प्रेमात?, दामिनीचा संशय ठरणार का खरा?, तर लोगोसाठी कोणाच्या डोळ्यांची होणार निवड?

‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारू आता बरी होऊन पुन्हा कामावर परतलेली असते. किर्लोस्कर मेंशनमध्ये ती पुन्हा कामाला येते तेव्हा गणी पारुची चांगलीच शाळा घेतो. तू आताच हॉस्पिटलमधून आली आहेस आणि तू लगेच कामाला पण सुरुवात केली असं म्हणत तो पारूची शाळा घेतो आणि पारूकडे चहा मागतो मात्र पारू म्हणते की, मी तुला आता चहा देणार नाही आदित्य सरांना मला कॉफी नेऊन द्यायची आहे. तेव्हा गणी रागावतो आणि म्हणतो की आदित्य सरांना कॉफी द्यायला तुझ्याकडे वेळ आहे आणि मला चहा द्यायला सांगितली तर तुला जमणार नाही. (Paaru Serial Update)

त्यावर पारू गणीला समजावते की, आदित्य सर आपले मालक आहे आणि ते मोठे आहेत त्यांच मला ऐकावंच लागेल. त्यानंतर पारू आदित्यला कॉफी घेऊन जाते तेव्हा पारूच्या कॉफीचं आदित्य भरभरून कौतुक करतो. पारू व आदित्य एकमेकांशी बोलत असतात तेव्हा दामिनी त्यांच्याकडे निरखून पाहत असते आणि दामिनीच्या मनात पारू व आदित्यबद्दल संशय येतो दामिनी हा संशय तिच्या नवऱ्याकडे व्यक्तही करते मात्र तिचा नवरा तिला मुर्खात काढत म्हणतो की, पारू आदित्य यांच्यामध्ये असं काहीच नाही. आणि आदित्यसाठी मुलगी वहिनी शोधणार आहेत. त्याच्यामुळे तू नको ते संशय काढू नकोस आणि तू, दिशा मिळून पारूच्या मागे हात लागून असतात ते माझ्या लक्षात आलं आहे. तुमच्यावर चांगलंच लक्ष आहे, असं म्हणून तो तिला सक्त ताकीद देतो आणि तिथून निघून जातो.

आणखी वाचा – श्रेया, भारत, कुशल नव्या शोमध्ये का नाहीत?, निलेश साबळेनं स्पष्टच सांगितलं, म्हणाला, “चॅनलने आमच्याबरोबर…”

तर इकडे आदित्य अहिल्यादेवी बोलत असतात, तेव्हा आदित्यच्या वडिलांना पारू येऊन ओरडत असते की, तुम्ही गोळ्या घेणं विसरला आहात?, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करताय, तुम्ही असं कसं विसरू शकता मात्र पारूला माहिती नसतं की, पाठीमागे अहिल्यादेवी व आदित्य उभे आहेत. आदित्य आवाज देतो तेव्हा त्यांना पाहून पारू दचकते आणि घाबरून तिथून निघून जाते. तर इकडे किचनमध्ये आल्यावर पारू हे सगळं सावित्रीला सांगत असते. तेव्हा तिथे दामिनी येते. दामिनी पारूचं बोलणं ऐकून तिला खूप सुनावते. आणि पारूला म्हणते की, तू आजवर या घरात येऊन इतक्या चुका केल्यास तरी तुला अहिल्या वहिनी का पाठीशी घालताहेत तेच मला कळत नाही. आताच्या आता कॉन्फरन्समध्ये चहा घेऊन स्वतः यायचं अशी ऑर्डर सोडून ती तिथून निघून जाते.

आणखी वाचा – “ते खूप घाण दिसतात”, नवऱ्याच्या लूकवरुन सुनावणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “चांगलं व वाईट दिसणं…”

तर एकीकडे काजळाच्या लोगोसाठी आदित्य काही डोळे शॉर्टलिस्ट करणार असतो. तेव्हा दिशा सुद्धा येऊन स्वतःचे काही फोटोज देऊन जाते आणि सांगते की, माझे डोळे सुंदर आहेत असे इतर लोक सांगतात त्यामुळे माझे डोळे सिलेक्ट होतील. आता काजळाच्या लोगोसाठी कोणाचे डोळे सिलेक्ट केले जाणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Prasad Oak Emotional Incident

“भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि…", प्रसाद ओकने सांगितली ती दुःखद घटना, म्हणाला, "त्यांना शेवटचं पाहताही आलं नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.