सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुलंही अभिनयाक्षेत्रात वा सिनेसृष्टीत आपलं नाव कमावू पाहत आहेत. यांत एका स्टारकीडच नाव आवर्जून घेतलं जाईल तो म्हणजे अभिनेता अभिनय बेर्डे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. लक्ष्मीकांत यांचं निधन झाल्यावर प्रिया बेर्डे यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यानंतर आता त्यांची दोन्ही मुलंही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. (Abhinay Berde Post)
अभिनयने आजवर त्याच्या वडिलांपाठोपाठ अनेक चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘बांबू’, ‘मन कस्तूरी रे’ या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमठवत अभिनयने साऱ्यांची मन जिंकली. बेर्डे या आडनावाचा अभिनयने कधीच वापर केला नाही. एकांकिकेचा वापर करत अभिनयने स्वबळाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनयने स्वतःची ओळख बनवत सिनेसृष्टीत छाप पाडली.
आणखी वाचा – असं आहे मुग्धा वैशंपायनच्या सासरकडचं घर, नवऱ्यासह कोकणात रमली गायिका, फोटो व्हायरल
अभिनयक्षेत्रात आल्यानंतर अभिनयही काही ट्रोलिंगपासून दूर राहिलेला नाही. अभिनयलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याआधी अभिनयने झालेल्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. दरम्यान अभिनयने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीवर अभिनयने एका नेटकऱ्याने केलेला मॅसेजचा स्क्रिनशॉट काढून शेअर केला आहे.
अभिनयने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्याने अभिनयला अपशब्द वापरले असल्याचं समोर आलं आहे. सदर मॅसेज करणारा व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा चाहता असल्याचं कळतंय, कारण त्याच्या अकाऊंटवर छत्रपती महाराजांचा फोटो दिसत आहे. अपशब्द वापरणाऱ्या नेटकऱ्याची ही पोस्ट अभिनयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे.