Tharal Tar Mag Todays Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सुभेदारांच्या घरी प्रतिमाचे लाड सुरु असतात. तर प्रतिमाचे दागिने किल्लेदारांच्या घरुन हरवलेले असतात. त्यावेळी नागराज त्याच्या बायकोचं नाव पुढे करत ती विसरली असं सांगतो. आणि रविराजच्या नजरेत मोठं बनण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर रविराज मिळालेले दागिने सायलीकडे जबाबदारी म्हणून सोपवतो पण हे काही तन्वीला आवडत नाही. त्यामुळे ती रविराजच्या हातून दागिने खेचून घेत माझ्या आईला मीच दागिने देईन असं सांगते.
सायली प्रतिमाला काही साड्या दाखवत आवडेल ती साडी नेसायला सांगते पण प्रतिमा मात्र साडी नेसायला नकार देते. सायलीने समजाल्यावर प्रतिमा साडी नेसायला अखेर तयार होते. सायली स्वतः प्रतिमाला साडी नेसवते आणि तयार करुन सगळ्यांसमोर आणते. त्यावेळी प्रतिमाला पूर्ण तयार झालेलं पाहून सगळेच बघत बसतात. पूर्णा आई प्रतिमाला पाहून भारावून जाते आणि दृष्ट लागू नये म्हणून सायलीला प्रतिमाला टीत लावायला सांगते. त्यावेळी रविराज मंगळसूत्राबद्दल प्रतिमाला विचारतो, मात्र ती काहीच बोलत नाही.
रविराज सायलीला मला सर नाही, तर काका म्हण असंही सांगतो. हे बघून तन्वीला अस्वस्थ वाटतं. सायलीने तिच्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकलेली असतात. जे नातं तुटायचं राहील होतं ते सायलीमुळे न तुटल्याचे रविराज बोलतो आणि तिचं तोंडभरुन कौतुकही करतो. त्यानंतर सायली सगळ्यांसाठी कॉफी बनवायला जाते. पूर्णा आई प्रतिमासाठी फुलं मागावते. प्रतिमासाठीची पूर्णा आईने मागवलेली फुलं रविराज घेऊन येतो.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनेक अडथळ्यातून पारू व अहिल्यादेवींचं व्रत पुर्ण, आतातरी आदित्यचा जीव वाचणार का?
तन्वी सायलीला स्वतःला कॉफी बनवायची इच्छा असल्याचे सांगते आणि ती स्वतः कॉफी बनवून घेते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन साठी कॉफी कोण बनवणार यावरुन तन्वी व सायलीमध्ये स्पर्धा लागते. आता या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरेल.