Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एका साधूने पारूला आदित्यचा जीव वाचवण्यासाठी व्रत करायला सांगितलेलं असतं आणि हे व्रत फक्त तू नाही तर त्या मुलाशी जोडलेल्या नाळेन म्हणजेच आईने सुद्धा केले पाहिजे असेही तो सांगतो. पारूसमोर मोठं आवाहन असतं मात्र पारू येऊन अहिल्या देवींसमोर सगळं घडाघडा बोलून मोकळी होते. त्यावर अहिल्यादेवी विचार करतात की, पारूने व्रत करायला सांगितलं असलं तरी पारूची देवावर खूप श्रद्धा आहे आणि ती खूप निखळ मनाची आहे त्यामुळे यापाठी नक्कीच काहीतरी असणार असं म्हणत अहिल्यादेवी भिक्षा व्रत करायचं ठरवतात.
त्यावेळेला अहिल्यादेवी सगळं वैभव मागे सोडून मंदिरात जात गुरुजींना भिक्षाव्रत करण्याबद्दल सांगतात त्यावर गुरुजी सांगतात की, जो घेतला आहेस तो निर्णय योग्यच आहे पण ते तुला झेपणार आहे का आणि हे व्रत करताना कुठेही मागे वळून पाहायचं नाही. बरेच अडथळे येतील मात्र तू थांबायचं नाही. यावर अहिल्यादेवी हे व्रत करायला होकार देतात तर इकडे पारू ही निर्जळी मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत लोटांगण घालत जाण्याचा व्रत सुरु करते. या वेळेला पारूबरोबर सावित्री पण असते तर अहिल्यादेवी गुरुजींनी दिलेलं कापड घेऊन घरोघरी भिक्षा मागायला जातात. त्यावेळेला काही लोक अहिल्या देवींना या अवस्थेत पाहून विचारपूस करतात. अहिल्यादेवी तुम्ही इथे मात्र त्या काहीच बोलत नाहीत तर मध्येच त्यांच्या पायात काटाही रुपतो आणि रक्तही येतं मात्र यावेळी अहिल्यादेवी खंबीरपणे पुढचा प्रवास सुरुच ठेवतात.
तर इकडे दिशाचा आदित्यला जिवे मारण्याचा डाव तिच्यावरच पलटलेला असतो, कारण दिशाचा माणूस जेव्हा आदित्यला मारायला म्हणून इंजेक्शन द्यायला जातो तेव्हा तिथं पारू येते आणि पारू त्या माणसाला विचारते तेव्हा तो गोंधळतो. हे इंजेक्शन तर डॉक्टर किंवा नर्स यांनी द्यायला हवं तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात असं विचारताच तो माणूस गडबडतो आणि म्हणतो की, हो मी पाठवतो डॉक्टरांना. असं म्हणून तो बाहेर निघून जातो. एकूणच दिशाचा हा प्लॅन फसलेला असतो त्यामुळे दिशाने ज्या मारेकराला पैसे दिलेले असतात त्यालाही ती खूप काही ऐकवते तर इकडे प्रिया आदित्यची काळजी घेण्यासाठी थांबते आणि प्रीतम अहिल्यादेवी बरोबर निघून जातो. अखेर आता मालिकेत पारू मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंतचा प्रवास हा पूर्ण करते तर इकडे अहिल्यादेवींनी ही घरोघरी भिक्षा मागून आणलेलं अन्न त्या शिजवण्यासाठी घेतात. एका आईची मुलासाठीची ही धडपड पाहणं साऱ्यांना रंजक ठरत आहे तर इकडे मनापासून पती मानलेल्या आदित्यसाठी पारूची मेहनत सुरूच असते.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी ते शिजवलेलं अन्न घेऊन गोरगरिबांना देतात आणि त्यानंतर उरलेलं अन्न घेऊन ते हॉस्पिटलमध्ये येत आदित्यला भरवतात तर इकडे पारू ते मंगळसूत्र आदित्यच्या हाताला लावते आणि आपल्या गळ्यात घालते. त्या वेळेला आदित्य थोडासा हलतो हे पाहून दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. आता आदित्यचा जीव वाचवण्यात अहिल्यादेवी व पारूचा खूप मोठा हात असणार आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.