Bigg Boss Marathi Serial Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात निक्की व अरबाजमध्ये पहिल्या दिवसापासून मैत्रीपूर्व वातावरण पाहायला मिळालं. निक्की व अरबाजमध्ये प्रेमाचे वारे वाहतानाही पाहायला मिळाले. इतर स्पर्धकही दोघांच जुळवून देताना दिसले. अगदी पहिल्या आठवड्यात निक्की व अरबाज यांनी गट तयार करत एकत्र खेळायचेही ठरवले. अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचे हार्ट बनवून गिफ्टही केले. हे पाहून निक्की खूप खुश झाली. दोघांमध्ये प्रेमाचे बंध सुरु असताना आता त्यांच्यात एक वादळ आलेलं पाहायला मिळत आहे.
निक्की व अरबाज यांच्यात पहिल्यांदा भांडण झालेलं पाहायला मिळालं. नुकताच निक्की व अरबाज यांचा भांडतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरबाज निक्कीवर ओरडतो आणि तिचा अनादर करतो. अरबाजच हे वागणं निक्कीला काही पटत नाही. त्यामुळे अखेर निक्की व अरबाजमध्ये भांडण झालेलं दिसलं. सुरुवातीला निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम, अरबाज व वैभव बोलत असतात. कोणा एका स्पर्धकाच्या खिशातून चष्माचा बॉक्स ते काढतात यावरुन त्यांच्यात बोलणं सुरु असतं. त्यावेळी अरबाज म्हणतो इतके नाजूक असतील तर इथे त्याने यायलाच नाही पाहिजे होत.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनेक अडथळ्यातून पारू व अहिल्यादेवींचं व्रत पुर्ण, आतातरी आदित्यचा जीव वाचणार का?
त्यावर जान्हवी बोलते, त्याने एकदा सांगितलं असतं की हात लावायचा नाही तर आम्ही हात लावला नसता. यावर अरबाज बोलतो, उद्या जर माझ्या बॉडीला टच झालं तर मी बोलणार मला फिझिकल झालं आहे. यावर निक्की म्हणते, हो हे मी सर्व मानते. तो नंतर यावर बोलला. यावर अरबाज निक्कीला म्हणतो, “ए तू त्याची बाजू घेऊ नकोस. घ्यायची असेल तर तू त्याची पूर्ण बाजू घे”. तेव्हा निक्कीही अरबाजवर आवाज चढवून, “मी त्याची बाजू घेत नाही आहे. आणि तू मला attitude दाखवू नकोस हा”, असं म्हणते.
त्यावेळी अरबाज तिकडून निघून जातो. यावर ओरडून निक्की म्हणते, “मी attitude दाखवत नाहीच आहे. तू इथून निघून गेला. हे असं असेल तर याच्याहून माझा राग जास्त आहे. हा माझा अपमान आहे. आणि त्याच्याकडून माझा आदर माझ्याकडे आल्याशिवाय मी त्याच्याकडे जाणार नाही”.